SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): घरगुती प्रश्नांत कदाचित तुमच्या भावंडांना तुमची गरज भासेल. काही प्रतिष्ठीत लोकांचा तुमच्यावर प्रभाव पडेल. सर्व कामांचा ताळमेळ साधावा. नवे प्लॅन्स तयार होतील आणि पूर्णत्वाकडेही जातील. आव्हाने कमी-अधिक प्रमाणात येत राहतील.

वृषभ (Taurus): आज नशीब आजमावण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगला समन्वय साधला जाईल. तुम्ही जर एक नवं रूटिन सवयीचं करून घेण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्हाला काही त्रासदायक क्षणांचा सामना करावा लागेल. काही गोष्टीवर सहज विश्वास ठेवाल.

मिथुन (Gemini) : वैवाहिक जीवनात अनुकूलता येईल. फार हट्टीपणा करू नका. ऑफिसात बॉसचे उपकार तुम्हाला घ्यावे लागतील. एककल्ली रूटिनच असेल. कुटुंबातील व्यक्तींशी चर्चेला अधिक प्राधान्य द्यावे. जनसंपर्क वाढेल. राजीनामा देण्याचा विचार करू नका.

कर्क (Cancer) : मनात परोपकाराची भावना जपाल. धार्मिक स्थळाला भेट द्याल. तुमच्या हाताखालच्या लोकांवर तुम्ही अधिक लक्ष द्या. काही गैरसमज असतील तर ते सोडवा. संधी मिळताच बाहेर फिरायला जायचं निश्चित करा. थोरांचा आशीर्वाद मिळेल.

सिंह (Leo) : जीवनाला बहर येईल. तुमच्या मनाला उभारी मिळण्याची गरज आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मनासाठी वेळ द्या. जुगारातून लाभ संभवतो. मित्रांसोबत फिरायला जाल. ऑफिसातल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. स्वभावात बदल होईल.

कन्या (Virgo) : योग साधनेवर भर द्यावा. आजचा दिवस मजेत घालवाल. बराच काळ तुम्ही ती कामं पुढे ढकलताय. रात्री पुरेशी झोप घ्या. संध्याकाळी एखादा मित्र भेटेल. चांगले शैक्षणिक परिणाम मिळतील. मुलांच्या समस्या ऐकल्या पाहिजेत. खिल्ली उडवली गेली तरी शांत बसा.

तुळ (Libra) : जवळच्या मित्राजवळ मन मोकळे करावे. कामे जलद गतीने पूर्ण होतील. आगामी घरगुती कार्यक्रमाची तयारी सुरू ठेवा. योग्य दिवशी महत्त्वाची कामं करण्यासाठी वेळ राखून ठेवा. नव्या रूटिनमध्ये तुम्ही चांगलं काम करत आहात. मन विचलित होऊ देऊ नका.

वृश्‍चिक (Scorpio) : सामाजिक स्तरावर सक्रिय राहाल. स्वभावात सौम्यता ठेवावी. मित्रांशी सलोखा वाढेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. आपले मत स्पष्टपणे मांडाल. एखाद्या रखडलेल्या निर्णयासाठी होकार देण्यासाठी हा काळ चांगला आहे. वडीलांचा मोलाचा सल्ला मिळेल.

धनु (Sagittarius) : दैनंदिन व्यायाम आता सक्तीने करायलाच हवा स्वत: साठी थोडा वेळ काढा. व्यापारी वर्ग खुश असेल. काही लोक जुन्या शत्रूचा बदला घेण्याची योजना आखू शकतात. आज सुरू केलेले काम फायदेशीर ठरेल. आवडीच्या कामात मन गुंतवावे.

मकर (Capricorn) : आरोग्यात सुधारणा होईल. मानसिक स्थैर्य लाभेल. तुमच्या अस्वस्थेसाठी अनेक कारणं आहेत पण लवकरच तुमच्यात नवा उत्साह भरण्यासाठी सर्व ऊर्जा सज्ज झाल्या आहेत. तुमचं कुटुंब तुमच्यासाठी एखादा महत्त्वाचा निर्णय घेईल.

कुंभ (Aquarious) : विचारपूर्वक घेतलेला निर्णय तुम्हाला पुढे जायला मदत करेल. मनातील इच्छा पूर्ण कराल. तुमच्या खासगी आयुष्यात घटना घडायला उशीर होतो त्याला काही माहीत नसलेले घटकही कारणीभूत असू शकतात. तुमच्याकडे एखादं उद्योगाचं प्रपोजल येईल जे तुम्हाला फायदेशीर ठरेल.

मीन (Pisces) : आरोग्याकडे लक्ष द्यावे.
समोरील अडचण सहज दूर करू शकाल. हातातील कामातून यश येईल. तुम्हाला एक चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे. पोटाचे त्रास संभवतात. वातूळ पदार्थ खाणे टाळावे. हित शत्रूपासून सावध राहावे. तुम्हाला जे मिळेल त्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.

Advertisement