SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आठवलेंनी शशी थरूर यांच्या पकडल्या इंग्लिशमधील चुका, मजेशीर ट्विट व्हायरल..

काँग्रेसचे खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) हे यशस्वी राजकारण्यासोबच इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वासाठी ओळखले जातात. केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Aathwale) यांनी मात्र चक्क काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याच इंग्लिशमधील चुका व स्पेलिंगमधील चुका दाखवण्याचे काम केले आहे. खासदार शशी थरुर आणि अनेक प्रकारे मनोरंजनात्मक गोष्टी करणारे रामदास आठवले यांच्यात झालेल्या या संवादाचे ट्वीटस आता व्हायरल होत आहेत.

देशात आठवलेंचे अशा काही गोष्टींमुळे लाखो फॅन्स आहेत. काल शशि थरुर यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पावरील केलेल्या भाषणावरील चर्चेवर टीका केली आणि त्यासंबंधी एक ट्विट केले. या ट्विटमधून टीका करताना शशी थरुर यांनी लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे भाषण सुरु असताना रामदास आठवले यांचा चेहऱ्यावरील एक वेगळा हावभाव असलेला फोटो ट्विटरवर पोस्ट करत काही मजकूर लिहिला. त्या फोटोमध्ये आठवलेंनी ‘आश्चर्यचकित’ हावभाव केले होते.

Advertisement

‘त्या’ व्हायरल ट्विटमध्ये काय?

देशात अनेक व्हायरल गोष्टीच्या चर्चा होत असतात. आता एकीकडे थरूर यांनी लोकसभेचा फोटो पोस्ट करताना आठवले यांचा उल्लेख करून दोघांमधील जणू ‘ट्विटर वॉर’ सुरू केलंय, असं दिसतंय. ते म्हणाले, “अर्थसंकल्पावर सुमारे दोन तास चर्चा झाली. मंत्री रामदास आठवले यांच्या चेहऱ्यावरील आश्चर्याचे भाव सारे काही सांगत आहेत. अर्थव्यवस्था आणि अर्थसंकल्पाबाबत अर्थमंत्र्यांच्या दाव्यांवर आघाडीचाही विश्वास बसत नाही,” असे थरूर यांनी म्हटले. तर काही वेळाने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही खासदार शशी थरूर यांना योग्य इंग्रजीत लिहिण्याचा सल्लाही दिलाय.

Advertisement

Advertisement

मात्र तो मजकूर लिहिताना त्यांचे रिप्लाय आणि बजेट या दोन शब्दांचे स्पेलिंग चुकले आणि आठवले यांनीही संधी साधत चुकांवर बोट ठेवत वक्तव्य करताना प्रत्यूत्तर दिलंय. केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, ” यात “Bydget” नाही तर BUDGET आणि rely नाही तर “reply” असं असते. ते म्हणाले, “प्रिय शशी थरूर जी, असे म्हणतात की अनावश्यक दावे आणि विधाने करताना चुका होणारच. इथे ‘Bydget’ नाही तर BUDGET होईल आणि rely ऐवजी ‘reply’ होईल, पण आम्ही समजू शकतो!” असे आठवले यांनी म्हटले आहे.

यावर पुन्हा थरुर यांनी रामदास आठवले यांनी दाखवून दिलेल्या चुकांचे स्वागत करत बरोबर करण्याबाबत काळजी घेण्याचे सांगितले. मात्र त्याचवेळी तिथे कोणतरी जेएनयुमधील उपस्थित आहे, असे म्हणत पुन्हा एकदा सीतारमन यांच्यावर टीका केली. एकंदरीत शशी थरूर आणि रामदास आठवले यांच्यात झालेल्या ट्वीटमुळे नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन झाले. अनेकांनी या ट्वीटवर मजेदार कमेंट्सही केल्या आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement