SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘पावनखिंड’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित, पाहा व्हिडीओ..

पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी मुघलांशी दिलेल्या लढ्याच्या शौर्यगाथेवर आधारीत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या ‘पावनखिंड’ या चित्रपटाचा ट्रेलर (Pawankhind Movie Trailer) प्रदर्शित झाला आहे. या अंगावर शहारे उभे करणाऱ्या ट्रेलरची सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू आहे.

चित्रपट प्रदर्शित कधी होणार?

Advertisement

‘पावनखिंड’ चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर चित्रपटाविषयी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याची माहिती फॅन्सना दिलीय. पोस्ट शेअर करून त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “उपसून तलवार, कधी झेलून वार, त्या रात्री सहाशे वीर, झाले जीवावर उदार, इतिहासातल्या अभूतपूर्व लढाईची झलक, सादर आहे ‘पावनखिंड’ चे ट्रेलर! हर हर महादेव”, असं त्यांनी त्या पोस्टमध्ये लिहिलं.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अनेक सुवर्णक्षणांपैकी आणखी एक सोनेरी क्षण मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यंदा शिवजयंतीनिमित्त जल्लोष हवा, शिवजयंती उत्साहात साजरी व्हावी, असं या अनेकांना वाटतं. आता हा चित्रपट येत्या 18 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) करत असून बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत अजय पूरकर (Ajay Purkar) आहेत. याव्यतिरिक्त या चित्रपटात मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni), प्राजक्ता माळी (Prajakta Mali), अंकित मोहन (Ankit Mohan), क्षिती जोग (kshitee jog), समीर धर्माधिकारी (Sameer Dharmadhikari) व शिवराज वायचळ (Shivraj Waichal) या कलाकारांनी भूमिका केल्या आहेत.

Advertisement

दरम्यान घोडखिंडीत झालेल्या या लढाईत बाजीप्रभूंनी महाराजांना सांगितले, “विशाळगडी जावे, गनीम अफाट आहे, गनीम दावा साधील, मी इथे खिंड रोखून धरतो. एकालाही खिंड चढून देत नाही”, असं सांगितलं. यानंतर झालेल्या लढाईचा थरार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. महत्वाचं म्हणजे मृणाल कुलकर्णी यांनी या वेळीही राजमाता जिजाऊंची भूमिका उत्तम केली आहे. हा सिनेमा 21 जानेवारीला प्रदर्शित होणार होता, पण कोरोना निर्बंधांमुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला होता. आता हा चित्रपट शिवजयंतीनिमित्त लवकरच चित्रपटगृहांत प्रदर्शित होत असल्याने लोकांचा आनंद हा द्विगुणित नक्कीच होणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement