SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पेटीएमची पैसा वसूल ऑफर, 4 रुपये ट्रान्सफर केले की, मिळणार 100 रुपये कॅशबॅक..

कोरोना काळानंतर तर प्रत्येक व्यक्ती ऑनलाईन बँकिंगकडे वळला आहे. म्हणून घरबसल्या काही सेकंदात आपलं काम आपण करू शकता. अनेक UPI Apps सध्या असताना अत्यंत गतीशील मनी ट्रान्सफर्स सेवा देणाऱ्या पेटीएम युपीआयचा भारतात अधिकाधिक युजर्स अवलंब करत आहे, जे अत्यंत सुरक्षित व विश्वसनीय आहे. आता कंपनीने एक ऑफर आणली आहे, त्यात ग्राहकांना फायदाच फायदा मिळणार आहे.

भारतातील दिग्गज डिजिटल पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी पेटीएमची (Paytm) पॅरेंट कंपनी वन97 कम्युनिकेशन्सने (One97 Communications) कंमुई 6 ते 20 फेब्रुवारी 2022 पर्यंत खेळवण्यात येणाऱ्या आगामी पेटीएम भारत वि. वेस्ट इंडिज (India VS West Indies) एकदिवसीय व टी-20 सामन्यांच्या मालिकेच्या दरम्यानच्या कालावधीत युपीआय मनी ट्रान्सफर्सवर (UPI Money Transfers) जबरदस्त कॅशबॅक (Cashback) ऑफर व इतर बक्षीस देण्याची (Rewards) घोषणा केली आहे.

Advertisement

किरॉन पोलार्ड बेपत्ता, कृपया पोलिसात तक्रार करा; कॅरेबियन अष्टपैलू DJ ब्रावोच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेला उधाण 

भारत वि. वेस्ट इंडिजच्या सामन्यांच्या दिवशी पेटीएमला जोडल्या जाणाऱ्या नवीन युजर्सना ‘4 का 100 कॅशबॅक ऑफर’चा लाभ घेता येणार असल्याचं कळतंय, जेथे त्यांना पेटीएम युपीआयच्या माध्यमातून मनी ट्रान्सफरसाठी 100 रूपयांची खात्रीदायी कॅशबॅक मिळेल. महत्वाचं म्हणजे या ऑफरमध्ये नवीन युजर्सना फक्त 4 रुपये ट्रान्सफर केलं तरी या ऑफरचा लाभ मिळणार आहे. याशिवाय युजर्स रेफरल प्रोग्राममध्ये सहभाग घेऊन त्यापेक्षाही जास्त कॅशबॅक मिळवून फायदा घेऊ शकतात.

Advertisement

ग्राहक युपीआय मनी ट्रान्सफर्स (UPI Money Transfer) साठी पेटीएमचा वापर करण्यास मित्र व कुटुंबातील सदस्याला आमंत्रित (invite) करेल, तेव्हा रेफरर (जो आमंत्रित करतो) व रेफ्री या दोघांना 100 रूपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. पेटीएमने या ऑफर्सचा चांगला प्रचार करण्याकरिता भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल, हरभजन सिंग व वेस्ट इंडिज संघाचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस गेल यांच्यासोबत ऑनलाईन मोहिम लाँच केलीय. पेटीएमच्या कॅशबॅकच्या या व्हायरल झालेल्या मोहिमेत तिन्ही खेळाडू धमाल गमतीजमती करताना दिसले.

भारतातील पेटीएमचे उपाध्यक्ष नरेंद्र यादव म्हणाले, “पेटीएम युपीआय खूप वेगवान व अत्यंत सुरक्षित मनी ट्रान्सफर्स सर्व्हिस देतेय, देशातील लाखो ग्राहकांना कंपनी सोयीसुविधा देते. आता आम्ही या आगामी क्रिकेट हंगामामध्ये आमची 100 रूपयांची कॅशबॅक देत स्पेशल ऑफरसह आमच्या युजर्ससोबत खेळाचा आनंद घेण्याची इच्छा आहे”, असं ते म्हणाले.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement