SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘मारुती’ची पहिली इलेक्ट्रिक कार येतेय.. बजेटमध्ये मिळणार आकर्षक फीचर्स..!

‘मारुती सुझुकी’.. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी.. सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला असतानाही, या ब्रँडकडून इलेक्ट्रिक कार लाँच न केल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. विशेष म्हणजे, प्रतिस्पर्धी ‘टाटा मोटर्स’ची ‘नेक्सॉन ईव्ही’ लाँच होऊन दोन वर्षे झाली, तरी ‘मारुती’ला इलेक्ट्रीक कार बाजारात आणता आलेली नव्हती.

मात्र, ‘मारुती’च्या वाहनांना पसंती देणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘मारुती सुझुकी’ची पहिली इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात येणार आहे.. भारतातील इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार काबीज करण्यासाठी ‘मारुती सुझुकी’ व ‘टोयोटा’ने मोठी रणनीती आखल्याचे सांगण्यात आले..

Advertisement

कशी असणार कार..?
‘मारुती सुझुकी’ची ही पहिलीच कार असणार आहे. ‘मारुती’कडून एक ‘इलेक्ट्रीक मिड साईज एसयूव्ही’ कार लाँच केली जाणार आहे. 2025 पर्यंत ही कार रस्त्यावर धावताना दिसू शकेल.. गुजरातच्या प्रकल्पात या कारची निर्मिती केली जाणार असून, इतर देशांतही या कारची निर्यात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

‘मारुती’ची ही इलेक्ट्रिक कार भविष्यातील डिझाइन लँग्वेजसह येईल, जी कंपनीच्या विद्यमान IC इंजिन मॉडेलपेक्षा पूर्णपणे वेगळी असेल. ही कार स्केटबोर्ड 27PL प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल, जी टोयोटा (Toyota) 40PL ग्लोबल आर्किटेक्चरवर आधारित आहे. ‘मारुती’च्या ‘एसयूव्ही’ला ‘YY8’ असा कोडनेम दिला आहे.

Advertisement
  • कारची लांबी 4300 मिमी, तर रुंदी 1790 मिमी व उंची 1620-1635 मिमी असेल.
  • आकारात, तो MG ZS EV सारखी असू शकते.
  • कारचा व्हील बेस 2700 मिमी असेल.
  • कारचा आकार लोकप्रिय ‘एसयूव्ही क्रेटा’पेक्षा मोठा असेल.
  • ‘मारुती’च्या ‘YY8 इलेक्ट्रिक एसयूव्ही’मध्ये 2WD (टू व्हील ड्राइव्ह) आणि AWD (ऑल व्हील ड्राइव्ह) देणार आहे. ‘एंट्री लेव्हल व्हेरियंट’मध्ये ‘टू व्हील ड्राइव्ह’ दिली जाऊ शकते.
  • कारची ‘टू व्हील ड्राइव्ह व्हेरियंट’ची रेंज 400 किमी, तर ‘फोर व्हील ड्राइव्ह व्हेरियंट’ची रेंज 500 किमीपर्यंत असेल..

किंमत किती..?
‘मारुती’च्या या कारच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. परंतु, भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ‘टाटा नेक्साॅन ईव्ही’ (Tata Nexon EV)शी थेट स्पर्धा करण्यासाठी या कारची किंमत कमी ठेवली जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार, या कारची किंमत 13 ते 15 लाख रुपयांदरम्यान असणार असल्याचे सांगितले जात आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement