SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रिचार्ज प्लॅन्स पुन्हा महागणार? करोडो ग्राहकांना पुन्हा महागाईचा शॉक लागणार..

देशातील आघाडीची कंपनीने फोन कॉल आणि इतर सेवांमध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत दिले आहे. कंपनीने ग्राहकांसाठी येत्या दोन वर्षांचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. ज्यामध्ये या टेलिकॉम कंपन्यांनी (telecom Company) असे संकेत दिले आहेत की, यंदाच्या वर्षात आता मोबाईल फोनवर बोलणं आणखी महागण्याची शक्यता आहे.

आता ग्राहकांवर किती रुपयांचे ओझे..?

Advertisement

रिचार्ज प्लॅन्स सद्या वाढीव दरातच लोकांना पुरवले जातात. सिम बंद होऊ नये यासाठी रिचार्ज लोकांना टाकावाच लागतो, म्हणजे महसूल काही थांबणार नाहीये. सिम कार्ड ही काळाची गरज असली, तरी अचानक काही महिन्यांतच कंपन्या कित्येक वेळा दरवाढ करून ग्राहकांचं नुकसान करत आहेत.

नोव्हेंबर 2021 मध्ये एअरटेलने मोबाईल आणि सेवांच्या दरात थोडी नव्हे तर तब्बल 18 ते 25 टक्क्यांनी वाढ केली होती. एअरटेलपाठोपाठ रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन-आयडिया कंपनीनेही आपापले कॉल दर आणि इतर सेवा महाग केल्या होत्या.

Advertisement

 

View this post on Instagram

 

Advertisement

A post shared by Spreadit (@spreadit_india)

Advertisement

भारती एअरटेलचे (Bharti Airtel) भारत आणि दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गोपाल विट्टल यांनी अधिक माहीती देताना म्हटलं की, “मला असं वाटतं की चालू वर्षी (2022) मोबाईल सेवांचे दर वाढण्याची शक्यता आहे. पण, येत्या 3 ते 4 महिन्यांमध्ये असं होणार नाही. त्यानंतर जर कंपन्यांनी ठरवलं तर मात्र, ही दरवाढ होऊ शकते.

भारती एअरटेलचे गोपाल विट्टल यांनी सांगितले की, “एअरटेल आता प्रत्येक ग्राहकाकडून रिचार्ज प्लॅन्सच्या (Airtel Recharge Plans) स्वरूपात 2022 मध्ये अंदाजे 200 रुपये वसूल करू शकते, अशी अपेक्षा आहे. याशिवाय आगामी काही वर्षात ही मर्यादा 300 रुपयांपर्यंत जाऊ शकते. पूर्वीप्रमाणेच या वेळीही आम्ही मोबाइल दरवाढीचा निर्णय घेण्यास पुढाकार घेऊ.”, असे त्यांनी दरवाढीचे संकेत दिले आहेत.

Advertisement

जाणून घेऊ एअरटेलबद्दलची काही आकडेवारी..

▪️ कंपनी उपकरणांचे अपडेट, नेटवर्क आणि क्लाउड बिझनेसवर 300 मिलियन डॉलर (2,250 कोटी रुपये) खर्च करणार- गोपाल विठ्ठल यांची माहीती
▪️ एअरटेलचा निव्वळ नफा: मागील वर्षी डिसेंबरच्या तिमाहीत भारती एअरटेल कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 2.8 टक्क्यांनी घसरून 830 कोटी रुपयांवर आलाय.
▪️ एअरटेलचे उत्पन्न: या तिमाहीत कंपनीचे एकत्रित उत्पन्न 12.6 टक्क्यांनी वाढून 29,867 कोटी रुपये झाले आहे.
▪️ एअरटेलची ग्राहक संख्या: मागच्या वर्षी डिसेंबर 2021 च्या तिमाहीत भारतातील एअरटेलचे 4G ग्राहक यावर्षी वाढून तब्बल 19.5 कोटी झाले आहेत. एका वर्षाआधी ही संख्या 16.56 कोटी होती.
▪️ प्रति ग्राहक डेटा: भारतातील एअरटेलच्या नेटवर्कवरील प्रति ग्राहक डेटा वापर 16.37 गीगाबिट (GB) वरून 11.7 टक्क्यांनी वाढून 18.28 GB पर्यंत आल्याचे समजते.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement