SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पडद्यामागील व्हायरल व्हिडिओ पाहा, ‘पुष्पा’ सिनेमाच्या लूकसाठी अल्लू अर्जुनवर घेतलीय ‘एवढी’ मेहनत..

देशात सगळीकडेच अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन महिने होत आले आहेत. अजूनही चित्रपटाची क्रेझ संपली नाही. या चित्रपटातील गाण्यांपासून डायलॉगपर्यंत सर्वत्र एकच चर्चा आहे ‘पुष्पा’ नावाचीच! या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय.

जगात चर्चेत असणाऱ्या या चित्रपटाच्या गाण्यांवर अनेक फॅन्स मजेशीर व्हिडीओ, रिल्स बनवत आहेत आणि मनोरंजन करत आहेत. आता अभिनेता अल्लू अर्जुनच्या फॅन्ससाठी अजून एक नवीन व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत अल्लू अर्जुनचे या चित्रपटात ‘पुष्पाराज’मध्ये ट्रान्सफॉर्मेशन कशा प्रकारे व्हायचे हे पाहायला मिळत आहे. अवघ्या काही क्षणात हा व्हिडीओ व्हायरल झाल्याचं समजतंय.

Advertisement

या व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुन हा आपल्या अलिशान गाडीमधून उतरत असल्याचा दिसतोय. त्याच्या आवडत्या काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये आकर्षक दिसणारा अल्लू अर्जुन त्याच्या गाडीमधून उतरुन व्हॅनिटी व्हॅनकडे जाताना दिसत आहे. त्याठिकाणी हेअर स्टायलिस्ट आणि मेकअप करणारे कलाकार आधीच हजर असल्याचे दिसत आहे.

यानंतर अल्लू अर्जुन खुर्चीवर बसून कॉफी पिताना दिसत आहे. तर दुसरीकडे हेअर स्टायलिस्ट त्याचे केस पुष्पा स्टाईलमध्ये बदलतोय आणि मेकअप करणारे कलाकार हे अल्लू अर्जुनचा मेकअप करताना दिसत आहेत. यात सुरुवातीला हेअर स्टालिस्ट त्याचे केस पुष्पराजप्रमाणे नीट व्यवस्थित करतात. त्यानंतर त्याला मेकअप केला जातो.

Advertisement

‘तो’ पडद्यामागील व्हिडीओ पाहा:

 

Advertisement
View this post on Instagram

 

A post shared by Sunil Arya™️ (@iam_sunil_arya)

Advertisement

अतिशय मनोरंजन त्याच्या कपाळावर जखमेची खूण करतात, जेणेकरून त्याचा चेहरा जरासा डॅशिंग दिसावा, असा करतात. मग त्यासोबत त्याच्या हात आणि छातीवरही मेकअप अर्थात चेहऱ्याच्या रंगाला साजेशा लूक केला जातो. तसेच त्याच्या या चेहऱ्यावर सर्वात शेवटी चामखीळ बनवली जाते. यानंतर तो हुबेहुब ‘पुष्पराज’ प्रमाणे दिसतो. यानंतर अल्लू अर्जुन हा खुर्चीवरून आरशाकडे पाहत पुष्पाप्रमाणे दाढीवरुन हात फिरवतो. महत्वाचं म्हणजे अशावेळी हा लुक पूर्ण सिनेमामध्ये मेकअप करणाऱ्यांना अगदी एकसारखा (काही अपवाद वगळता) ठेवणे गरजेचे असते.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement