SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘टाटा नॅनो’ कार आता इलेक्ट्रिक रुपात, जबरदस्त रेंजसह आकर्षक फीचर्स..

सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. विविध कंपन्याही आता इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करीत आहेत. त्यात भारतातील आघाडीचा टाटा उद्योग समूहही मागे नसल्याचे दिसते..

सर्वसामान्य माणसाला स्वत:च्या कारमधून फिरता यावे, यासाठी टाटा उद्याेग समूहाने ‘नॅनो’ ही कार बाजारात आणली होती. आकाराने ही सर्वात छोटी कार होती. टाटा मोटर्स (Tata Motors) ची ‘टाटा नॅनो’ हे ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांचे स्वप्न होते. त्यानुसार ही कार रस्त्यावर आली खरी, पण काही वर्षांतच तिचे उत्पादन बंद झाले..

Advertisement

मोठा गाजावाजा करुन बाजारात आलेल्या ‘नॅनो’ कारला लोकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.. गेल्या दोन वर्षांत तर ‘टाटा नॅनो’च्या केवळ एक-दोनच कार बनल्या आहेत. मात्र, असे असले तरीही रतन टाटा नाउमेद झालेले नाहीत. आता ही कार नव्या स्वरुपात ग्राहकांसमोर येत आहे.. आता ‘टाटा नॅनो’ कार इलेक्ट्रीकमध्ये तयार करण्यात आली आहे.

इलेक्ट्रीक वाहनांसाठी पावरट्रेन बनविणाऱ्या ‘इलेक्ट्रा ईव्ही’ (Electra EV) या कंपनीने ‘टाटा नॅनो’ला ‘कस्टमाईज’ केले आहे. ‘टाटा नॅनो’ला ईव्ही कारचे रुप दिले आहे. नुकतीच रतन टाटा यांना 72V Nano EV ही कार देण्यात आली. त्यावेळी त्यांना ही कार प्रचंड आवडली. या कारमधून सैर करण्याचा मोह त्यांनाही आवरला नाही.

Advertisement

रतन टाटा यांनीही या कारचे कौतुक केले. टाटा यांच्याकडून पाठीवर शाबासकीची थाप पडल्याने कंपनीलाही आनंद झाला. टाटा यांच्याकडून मिळालेला फिडबॅक हा सुपर प्राऊड असल्याची प्रतिक्रिया कंपनीने दिली आहे.

‘टाटा नॅनो ईव्ही’ची वैशिष्ट्ये
– टाटा नॅनो ईव्ही ही कार 4 सीटर आहे.
– ही कार 10 सेकंदांपेक्षा कमी वेळेत 0 ते 60 किमी प्रतितास वेग पकडते.
– कारमध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर केला आहे. त्यामुळे कारचा खरा अनुभव येत असल्याचे टाटा मोटर्सचे म्हणणे आहे.
– ग्राहकांना इको-फ्रेंडली व खासगी वाहतूक देताना कोणतीही तडजोड केली नसल्याचे कंपनीचा दावा आहे.

Advertisement

– कस्टम बिल्ट नॅनो ईव्हीमध्ये 72V आर्किटेक्चर वापरले आहे. टिगोर ईव्हीमध्येही हीच पॉवरट्रेन वापरली गेली आहे.
– कंपनीने कारच्या डिझाइनमध्ये काही बदल केले. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) द्वारे प्रमाणित या कारने 213 किमीची रेंज गाठली. असे करताना कंपनीने पॉवरट्रेनमध्ये कोणतेही भौतिक बदल केले नसल्याचे सांगण्यात आले.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement