SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता इंटरनेट नसलं तरीही आधार कार्ड लॉक करता येणार, आधार कार्डचा गैरवापर झालाय, तर वाचा..

भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) हे अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट झाले आहे. कोणत्याही सरकारी सुविधांचा लाभ घ्यायचा असेल, ओळखपत्र म्हणून अनिवार्य जरी नसले तरी सहसा आधार सारखा जास्त वापर आणि तोही सरकारी कामातही असता भरपूर वाढला आहे. बहुतांश ठिकाणी कामानिमित्त आपल्याला आधार कार्ड जवळ असणे आवश्यक असते. पण त्याचा गैरवापर झाला तर UIDAI नं आधार लॉक करण्याची सुविधा देखील दिली आहे.

तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला तर…

Advertisement

मृत व्यक्तिच्या आधार कार्डचा वापर अनेक चुकीच्या कामांमध्ये केला जाऊ शकतो. आधार कार्डला एक युनिक आयडी आहे, त्यामुळे ते रद्द करता येत नाही पण जर आपल्या आधार कार्डचा चुकीचा वापर झाला किंवा हरवले तर ते तुम्ही ऑनलाईन ब्लॉक करू शकता आधार कार्ड ब्लॉक करण्यासाठी जाणून घ्या काय करायचं..

 

Advertisement
View this post on Instagram

 

A post shared by Spreadit (@spreadit_india)

Advertisement

देशातील कोणतेही नागरिक जे आधार कार्डधारक आहेत, त्यांना त्यांचा आधार नंबर फक्त एसएमएस (SMS) पाठवून लॉक आणि अनलॉकदेखील करता येणार आहे. कित्येक लोकांकडे आज 2G/3G फीचर्स फोन असल्याने त्याला इंटरनेट सुविधा नसते किंवा इंटरनेट वापरण्यास अडचण येते. अशा सर्व मोबाईलधारकांसाठी सरकारने लोकांना आधार लॉक आणि अनलॉक करण्याची सुविधा दिली आहे.

Advertisement

सर्वप्रथम व्हर्च्युअल आयडी जनरेट करा

▪️ एसएमएस (SMS) च्या माध्यमातून Aadhaar Lock-Unlock करण्यासाठी सर्वप्रथम आधार कार्डचा व्हर्च्युअल आयडी बनवावा लागणार आहे. तो इंटरनेटविना बनवता येणार आहे.
▪️ आधार कार्ड व्हर्च्युअल आयडी तयार करण्यासाठी, प्रथम तुमच्या मोबाइलच्या एसएमएस बॉक्समध्ये जाऊन आणि GVIDAadhaar-Number-शेवटचे 4 अंक टाइप करा.
▪️ मग आधार क्रमांकाच्या शेवटचे 4 अंक टाकून 1947 क्रमांकावर RVIDAadhaar-Number-last-4-digits असा मेसेज पाठवा. आता तुमचा व्हर्च्युअल आयडी जनरेट होईल.
▪️ मग OTP मिळविण्यासाठी, तुम्ही हा GETOTPAadhaar-NUMBER-last-4-digits असा मेसेज करून 1947 क्रमांकावर पाठवा
▪️ व्हर्च्युअल आयडीचा नंबर वापरत असल्यास GETOTPVirtual ID-NUMBER-last-6-digits असा मेसेज 1947 ला पाठवून तुम्ही ओटीपी मिळवू शकता. आधार लॉक अनलॉक करण्यासाठी व्हर्च्युअल आयडी जेनरेट करणं आवश्यक आहे.

Advertisement

*एसएमएस सेवा वापरून आधार क्रमांक लॉक/अनलॉक कसे करायचे ?

▪️ व्हर्च्युअल आयडी जनरेट केल्यानंतर, तुम्ही 1947 क्रमांकावर LOCKUIDAadhaar Number-अंतिम 4 अंक- 6 अंकी ओटीपी दुसरा मेसेज पाठवू शकता.

Advertisement

▪️ दुसरीकडे, जर अनेक आधार कार्ड एका क्रमांकाशी जोडलेले असतील, तर तुम्ही LOCKUIDAAadhaar Number-शेवटचे 8 अंक – 6 अंकी ओटीपी टाकून मेसेज करून आधार लॉक देखील करू शकता.

▪️ लॉक केले आधार कार्ड अनलॉक करण्यासाठी, 1947 क्रमांकावर UNLOCKUIDVirtual-ID-शेवटचे 6 अंक – 6 अंकी ओटीपी पाठवून तुमचे आधार कार्ड अनलॉक करू शकता.

Advertisement

जर इंटरनेट सेवा असेल तर मेसेजविनाही तुम्ही हे काम करू शकता..

▪️ तुम्हाला सर्वात आधी आधारसंबंधी अधिकृत वेबसाईट, uidai.gov.in वर जावे लागेल. यानंतर My Aadhaar वर क्लिक करा.
▪️ आता तुमच्या समोर Lock UID आणि Unlock UID चा पर्याय उघडेल. तिथे आता UID Lock वर क्लिक करा.
▪️ यानंतर आधार कार्ड क्रमांक आणि तुमचे नाव आणि पिन टाका.
▪️आता नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाकल्यावर आणि तुमचे आधार ब्लॉक होईल.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement