SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

टीम इंडियाचा वन-डे मालिकेतील दुसरा विजय, वेस्ट इंडिजविरुद्ध प्रसिध कृष्णाने घेतल्या 4 विकेट्स..

टीम इंडियाने (Team India) वेस्ट इंडिजवर (West Indies) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (India vs West Indies, 2nd ODI) 44 धावांनी विजय मिळवला आहे. अजून एक सामना बाकी असला तरी या विजयासह टीम इंडियाने मालिकाही जिंकली आहे. यावेळी नवख्या प्रसिध कृष्णाने दडपण आणणारी गोलंदाजी करत विंडीजच्या नाकात दम आणला.

टीम इंडियाने विंडिजला विजयासाठी 238 धावांचे टार्गेट दिले होते. मात्र टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर विंडिज 46 षटकांमध्येच 193 धावांवर ऑलआऊट झाले. विंडिजकडून शमर ब्रूक्सने सर्वाधिक 44 धावा केल्या. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनीही भारताची दमछाक करून टाकत फक्त 9 बाद 237 धावांपर्यंतच मजल मारू दिली.

भारताकडून प्रसिध कृष्णाने सर्वाधिक 4 विकेट्स (Prasidh krishna 4 wickets) घेतल्या, शार्दुल ठाकुरने 2 तर उर्वरित मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, दीपक हुड्डा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतलीय.

भारतीय संघासाठी लोकेश राहुल (49) व सूर्यकुमार यादव (64) यांनी मधल्या फळीत चांगलं योगदान देत डाव सावरला. रोहित शर्मा (5), रिषभ पंत (18), विराट कोहली (18), वॉशिंग्टन सुंदर (24), दीपक हुड्डा (29), शार्दुल ठाकूर (8), मोहम्मद सिराज (3), युजवेंद्र चहल (11) यांनीही हातभार लावला.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल आणि प्रसिध कृष्णा.

टीम वेस्ट इंडिज : निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप (विकेटकीपर), ब्रँडन किंग, शमारह ब्रुक्स, डॅरेन ब्राव्हो, जेसन होल्डर, ओडियन स्मिथ, अकेल होसेन, फॅबियन ॲलन, अल्झारी जोसेफ आणि केमार रोच.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा

Advertisement