SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ कारणामुळे देशात 3 वर्षांत 25 हजार आत्महत्या, नेमकं कारण काय, वाचा…

शेती म्हटलं की, खर्च सतत करावं लागणं आणि उत्पन्न निघेल की नाही हे माहीत नसताना जमिन कसणं शेतकरी थांबवत नाही. शेतीमध्ये कितीही क्रांती झाली तरीही कधी दूषित हवामान, गारपीट, अवेळी पाऊस तर कधी आश्वासने देणारे राजकीय वारे यांमुळे शेतकऱ्याचं मधोमध मरण होतं. याशिवाय कोणी खाजगी, शैक्षणिक कारणांसाठीही कर्ज घेतात आणि वेळेवर परतफेड न झाल्याने काही धक्कादायक पर्याय निवडतात.

भारतासारख्या शेतीप्रधान देशाला भविष्यातील विकासाचे चित्र सरकारकडून रंगवून सांगितले जात असताना कोरोना काळात आर्थिक अडचणींचा सामना करणारा शेतकरी, कोरोनामुळे कर्ज घेऊन निवारा करणाऱ्यांमध्ये वाढ झाली मग या ओझ्याने सामान्य नागरिकांचे जगणे किती अवघड झाले, याची आपल्यावर येणाऱ्या संकटांमुळे प्रचिती आलीच असेल, अशीच काही आकडेवारी बोलतेय की, शेती कसणाऱ्या बळीराजाचे हाल किती झाले असतील.

Advertisement

आत्महत्यांच्या आकडेवारीवर एक नजर…

देशामध्ये 2018 ते 20 या तीन वर्षांमध्ये हाताला काम नसल्याने बेरोजगारीमुळे 9 हजार 140 आत्महत्या झाल्या. तर, सामान्य नागरिक असो की शेतीसाठी कर्ज घेणारा शेतकरी इ. नी फक्त कर्जमुक्त होण्यासाठी अनेक पर्याय निवडले. कारण कर्जाचा बोजा अंगावर झाला की, कौटुंबिक वाद होणे आलेच, आई-वडील म्हणून कर्तव्य आणि खांद्यावर जबाबदारी आलीच. अशाच कित्येक त्रासातून मुक्त होण्यासाठी लोक आत्महत्या सारखा पर्याय निवडतात.

Advertisement

 

View this post on Instagram

 

Advertisement

A post shared by Spreadit (@spreadit_india)

Advertisement

कर्जबाजारीपणामुळे 16 हजार 91 अशा 25 हजार लोकांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) दिलेल्या आकडेवारीच्या आधारे केंद्राने आत्महत्यांसंदर्भातील माहिती वरिष्ठ सभागृहात मांडली. आता केंद्र सरकारकडून राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम राबवणं चालू असून त्याद्वारे देशभरातील 692 जिल्ह्यांत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाला साहाय्य करत आहे. मानसिक आरोग्य सुधारणा कार्यक्रम व रोजगाराच्या अनेक नवनवीन संधी उपलब्ध करून देशातील आत्महत्या रोखण्याचा केंद्र प्रयत्न करत असल्याचं राय यांनी सांगितलं.

कोरोना काळात सर्वाधिक आत्महत्या: बेरोजगारीमुळे आत्महत्यांचे प्रमाण हळूहळू वाढत गेले असून कोरोनाच्या काळात 2020 मध्ये ते सर्वाधिक म्हणजे 3 हजार 548 इतके होते. 2018 मध्ये 2 हजार 741 जणांनी तर, 2019 मध्ये 2 हजार 851 जणांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

Advertisement

दिवाळखोरीमुळे आत्महत्या: कर्जबाजारीपणा वा दिवाळखोरीमुळे 2018 मध्ये 4 हजार 970, 2019 मध्ये 5 हजार 908 जणांनी आत्महत्या केली. 2020 मध्ये ही संख्या 600 ने कमी झाली. या काळात 5 हजार 213 जणांनी मृत्यूला कवटाळले आहे, ही अतिशय धक्कादायक बाब आहे.

👉 भारत सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमासंबंधी हेल्पलाईन नंबर: 1800-599-0019 (मराठीसह 13 भाषांमध्ये सेवा) किंवा अधिक माहीतीसाठी या वेबसाईटला भेट द्या: https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1652240

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement