SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एका चार्जमध्ये 165 किमीची देतेय रेंज, ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर आहे तरी कोणती? वाचा जबरदस्त फीचर्स..

जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) खरेदी करण्याचा निर्णय घेतला असेल आणि यावेळी चांगले पर्याय शोधत असाल, तर बरेच पर्याय उपलब्ध आहेत. जर तुमचे बजेट जास्त नसेल आणि किफायतशीर आणि लांब बॅटरी रेंजच्या स्कूटरबद्दल माहिती हवी असेल, तर जाणून घ्या..

आपल्याला कोणालाही पेट्रोलवर चालणारी दुचाकी चालवायची म्हटलं तर ती किती किमी जाईल ही धाकधूक थोडी का होईना असतेच. समजा जर तुम्ही दिवसातून 100 किमी पेक्षा जास्त प्रवास करत असाल तर पेट्रोलची भाववाढ जास्त आहे असं सतत मनात आपल्याकडूनच बिबवलं जातं. मग तुमच्यासाठी Hero Electric NYX HX इलेक्ट्रिक स्कूटर सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. कारण ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये 165 किमीपर्यंतची रेंज देते, अशी माहीती आहे.

Advertisement

Hero NYX HX चे आकर्षक फीचर्स

Hero NYX HX इलेक्ट्रिक स्कूटरचे वजन 87 किलो एवढं असून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर 165 किमीची रेंज देते. होय! Hero Electric NYX HX चा टॉप स्पीड हा प्रतितास 42 किमी आहे. या स्कूटरचा ग्राउंड क्लीयरन्स 141 mm आहे आणि यासोबतच हिरो कंपनीकडून बॅटरी आणि मोटरची 3 वर्षांची वॉरंटीही देण्यात आली आहे. म्हणजे तुमची खरेदीही असता सुरक्षित असणार आहे.

Advertisement

हीरो इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्टार्ट/स्टॉप बटण, फ्रंट स्टोरेज बॉक्स, डिजिटल स्पीडोमीटर, लो बॅटरी इंडिकेटर, स्टेप्ड सीट, ओडोमीटर, रिजनरेटिव्ह ब्रेक, यूएसबी चार्जिंग पोर्ट, एलईडी हेड लॅम्प आणि टर्न सिग्नल यांसारखी फीचर्स मिळतील. इलेक्ट्रिक स्कूटर 600/1300-वॅट मोटरमधून उर्जा निर्माण करते, जी तीन 51.2V/30Ah लिथियम-आयन बॅटरी पॅकशी संलग्न आहे.

आघाडीची कंपनी हिरो इलेक्ट्रिकने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये CBS ब्रेकिंग सिस्टम दिली आहे. तर पुढील आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक उपलब्ध असतील. एवढंच नव्हे तर स्कूटरला अलॉय व्हील मिळणार असून पुढच्या चाकाचा जो आकार आहे , तो जवळजवळ 10 इंच असणार आहे आणि मागील चाकाचा आकार देखील 10 इंच असणार आहे. जर या स्कूटरच्या सस्पेन्शनबद्दल बोलायचं झालं तर पुढील बाजूला टेलिस्कोपिक आणि मागील बाजूस ट्विन शॉक ऍब्जॉर्बर देण्यात आलाय.

Advertisement

हिरो NYX HX इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत किती?

हिरो इलेक्ट्रिकच्या या इलेक्ट्रिक स्कूटरची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 77,442 रुपये आहे. एका वेबसाइटनुसार, तुम्ही ते 2,626 च्या EMI वर घरी आणू शकता. कंपनीने Hero Electric NYX HX मध्येही अनेक पर्याय दिले आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर कस्टमाइझ देखील करू शकता. स्कूटरला कस्टमाइझ करण्यासाठी त्यात आइस बॉक्स आणि स्प्लिट सीट असे अनेक पर्याय देण्यात आले आहेत.

Advertisement

(हिरोच्या या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत देशातील वेगवेगळ्या शहरांनुसार वेगळी असेल, अचूक किंमत जाणून घेण्यासाठी आपण स्थानिक डिलरशी संपर्क करावा.)
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement