SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): मित्राच्या मदतीने कामाच्या ठिकाणी कोणतीही समस्या सोडवता येईल. व्यावसायिक निर्णय घ्यायचे असतील तर थोडे थांबा. धार्मिक कार्य होईल. लॉटरी मधून लाभ मिळू शकतो. कौटुंबिक जीवनात समाधान लाभेल. मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल.

वृषभ (Taurus): अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने शेअर बाजारात पैसे गुंतवले तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी एकाग्रता ठेवावी. आर्थिक गणित जुळून येईल. घराकडे लक्ष असू द्या. अत्यंत जपुन काळजीपूर्वक दिवस घालवा. कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो.

मिथुन (Gemini) : प्रत्येक काम योग्य पद्धतीने पार पाडू शकाल. जनसंपर्कात वाढ होईल. घरातील टापटीप कटाक्षाने पाळाल. विना संकोच बोलाल. जवळच्या मित्रांना घरी बोलवाल. शक्यतोवर घरात शांतपणे रहा. वाहन, दुखापत, यापासून जपा. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल.

Advertisementकर्क (Cancer) : काही लोक घराच्या सजावटीवर पैसे खर्च करू शकतात. जोडीदारासोबत मजेत वेळ घालवाल. निसर्गरम्य ठिकाणाला भेट द्याल. खाण्यावर नियंत्रण ठेवावे.
पोटाची काळजी घ्या. आर्थिक बाबतीत केलेले प्रयत्न यश देतील. कुटुंबातील सदस्य पाठिंबा देतील.

सिंह (Leo) : जर तुमचा जोडीदार नोकरी करत असेल तर त्यांना आज कार्यक्षेत्रात यश मिळू शकते. घरातील शांतता भंग होऊ देऊ नका. छोटेसे काही काम असेल तरीही मिळून करावे. दिवस मध्यम जाईल. कौटुंबिक जीवनात काही सुखद अनुभव येतील.

कन्या (Virgo) : कुटुंबातील लोकांसमवेत प्रवास कराल. तुमचे विचार सकारात्मक ठेवा. विरोधकांपासून सावध राहावे. आवडीचे पदार्थ चाखाल. दिवस मनाजोगा घालवाल. आर्थिक व्यवहार जपून करा. कार्यालयातील वरिष्ठ तुमचे मनोधैर्य वाढवतील. तुमच्या अपेक्षा वाढतील.तुळ (Libra) :आर्थिक प्रगती साधता येईल. कोणावरही जास्त विश्वास ठेऊ नका. सामाजिक स्तरावर बोलताना भान राखावे. घाईघाईने निर्णय घेऊ नका. आज शरीर विश्रांतीची मागणी करेल. पूर्वीच्या दिवसांमध्ये केलेली मेहनत फळाला येईल. तुम्हाला तुमचे मुद्दे मांडण्यात खूप अडचणी येतील

वृश्‍चिक (Scorpio) : तब्येतीत सुधारणा करावी लागेल. अचानक धनलाभाची शक्यता. आठवडा भर दगदग केल्यामुळे आज थकवा वाटेल. आराम करा. ध्यानधारणा करण्यावर लक्ष केन्द्रित करावे. तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. रिकाम्या वेळेत आज टीव्ही किंवा मोबाईलवर वेब सीरीज पाहू शकता.

धनु (Sagittarius) : कौटुंबिक जीवनाची गाडी पुन्हा रुळावर येईल. कोणालाही शब्द देऊ नका. कचेरीची महत्त्वाची कामे पुढे . सध्याचा काळ जोडीदाराची भरभराट करणारा आहे. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आज अडचणी आणतील

Advertisementमकर (Capricorn) : वैवाहिक जीवनात सुसंवाद ठेवावा. सहवासाचा आनंद लुटाल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. मित्रांची उत्तम साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी अचानक संधी, उत्कर्ष होईल. वरच्या पदावरील व्यक्तींपुढे गुडघे टेेकावे लागतील. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. आपला मान आज लोक ठेवतील.

कुंभ (Aquarious) : क्षुल्लक कारणांवरून काळजी करत बसू नये. मनातील भावना मांडता येतील. व्यापार्‍यांना चांगला आर्थिक लाभ होईल. घरासाठी थोडा वेळ काढावा लागेल. मुले आज तुमचा वेळ घेणार आहेत. कुटुंब-मुले यांच्यासमवेत वेळ घालवल्याने समाधान मिळेल. लांब फिरण्यासाठी मित्रांना फोन कराल.

मीन (Pisces) : सामाजिक स्तरावर आज बोलण्यापेक्षा इतरांच्या गोष्टी समजून घ्याव्यात. काही कारणाने आर्थिक खर्च पण बराच होईल. भावंडाची भेट होईल. दिवस चांगला आहे. खेळीमेळीचे वातावरण राहील. तुमचा बॉस किंवा मालक तुमच्याशी नेहमी उद्धटपणे का वागतो या मागचे सत्य तुम्हाला आज कळेल.

Advertisement