‘रिलायन्स जिओ’.. टेलिकाॅम क्षेत्रातील सध्या भारतातील आघाडीचे नाव.. गेल्या काही दिवसांत टेलिकाॅम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या दरात कमालीची वाढ केल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. अशा वेळी इतर कंपन्यांची तुलना केल्यास ‘रिलायन्स जिओ’चे रिचार्ज प्लॅन स्वस्त असल्याचे पाहायला मिळते..!
‘एअरटेल’ व ‘वोडाफोन-आयडिया’ या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत ‘रिलायन्स जिओ’कडे एकापेक्षा एक शानदार रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. त्यामध्ये डेटा, कॉलिंगसह अतिरिक्त फायदेही ग्राहकांना मिळतात. ‘जिओ’ने अगदी 14 दिवसांपासून ते 365 दिवसांच्या वैधतेसह शानदार प्लॅन्स बाजारात आणले आहेत. त्यात ग्राहकांना रोज 1 जीबी ते 3 जीबीपर्यंत डेटा मिळतो.
View this post on Instagram
Advertisement
‘रिलायन्स जिओ’ने नुकताच एक स्वस्तात मस्त प्लॅन बाजारात आणला आहे, जो 200 रुपयांच्या आत मिळतो. विशेष म्हणजे, त्यात ग्राहकांना अनलिमिटेड काॅलिंग, रोजचा 1 जीबी डेटा यांसह विविध सुविधा मिळत आहेत. चला तर मग या खास प्लॅन्सबाबत सविस्तर जाणून घेऊ या..!
‘जिओ’चा 186 रुपयांचा प्लॅन..
‘रिलायन्स जिओ’चा हा 186 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे.. त्यात ग्राहकांना कोणकोणते फायदे मिळणार आहेत, हे जाणून घेऊ या..
- ग्राहकांना दररोज 1 जीबी डेटा दिला जाणार. डेली डेटा संपल्यानंतर यूजर्स 64 ‘केबीपीएस’ स्पीडने इंटरनेट वापरू शकतात.
- ‘जिओ’च्या या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे, म्हणजेच ग्राहकांना एकूण 28 जीबी डेटा मिळेल.
- या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. ग्राहक 28 दिवस देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड मोफत कॉलिंगचा आनंद घेऊ शकतात.
- शिवाय दररोज 100 मोफत ‘एसएमएस’चाही लाभ ग्राहकांना मिळेल.
- जिओ मूव्ही, जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाउड, यांसारख्या जिओ अॅप्सचेही मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे.