SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रोज 262 रुपये गुंतवा नि मिळवा 20 लाख रुपये..! ‘एलआयसी’च्या खास योजनेबाबत जाणून घ्या..!

‘एलआयसी’.. अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळ.. भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी.. विमा योजनेच्या माध्यमातून ‘एलआयसी’ (LIC) नागरिकांचे भविष्य सुरक्षित करतेच.. शिवाय सुरक्षित गुंतवणुकीची, तसेच त्यातून चांगल्या परताव्याचीही हमी ही कंपनी देते.. सरकारी कंपनी असल्याने त्यातील गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते.

‘एलआयसी’च्या अनेक योजना असल्या, तरी त्यातील काही याेजनांना ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यापैकीच एक योजना म्हणजे, ‘एलआयसी जीवन लाभ पॉलिसी.. (LIC Jeevan Labh Policy). ही एक एन्डॉवमेंट पॉलिसी आहे.. म्हणजेच या पाॅलिसीमध्ये विमा संरक्षणासह आर्थिक बचतही होते..

Advertisement

एलआयसी जीवन लाभ योजनेबाबत…
‘एलआयसी’ने 1 फेब्रुवारी 2020 रोजी ही पाॅलिसी सुरु केली. ही एक नॉन-लिंक्ड, सहभागी, वैयक्तिक, जीवन विमा बचत योजना आहे, ज्यात नागरिकांना संरक्षणासह बचतही होते. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर विमाधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते.

तसेच पॉलिसीधारकाला त्याच्या हयातीतही एकरकमी पैसे मिळतात. योजनेवर पाॅलिसीधारक कर्जही घेऊ शकतो. या योजनेत 16 वर्षे, 21 वर्षे आणि 25 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसह गुंतवणूक करता येते. प्रीमियम भरण्याची मुदत 10 वर्षे, 15 वर्षे आणि 16 वर्षे आहे. मासिक, त्रैमासिक, सहामाही नि वार्षिक आधारावर प्रीमियम भरता येतो.

Advertisement

‘एलआयसी जीवन लाभ योजने’त गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही. मात्र, किमान तुम्ही 2 लाख रुपये गुंतवू शकता. त्यानंतर तुम्हाला आयकरातूनही सूट मिळते.

कोण गुंतवणूक करु शकतो..?
‘एलआयसी’च्या या योजनेत 8 ते 59 वर्षे वयोगटातील कोणीही गुंतवणूक करू शकतो. मासिक प्रीमियम भरल्यास, तुम्हाला उशीरा पेमेंटसाठी 15 दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळतो. त्रैमासिक, सहामाही व वार्षिक आधारावर प्रीमियम भरल्यास, तुम्हाला 30 दिवसांचा जादा कालावधी मिळेल. गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर विमा रकमेइतकी रक्कम नॉमिनीला मिळते.

Advertisement

20 लाख रुपये कसे मिळणार..?
‘एलआयसी’च्या या योजनेत तुम्ही 20 लाख रुपयांची विमा रक्कम निवडल्यास, तुम्हाला 16 वर्षांसाठी (प्रिमियम भरण्याची मुदत) सगळ्या करांसह 7,916 रुपये भरावे लागतील. म्हणजेच दररोज अंदाजे 262 रुपये..!

सोबतच 25 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी असेल. मॅच्युरिटीवर 20 लाख रुपयांची हमी मिळेल. मॅच्युरिटीपर्यंत पाॅलिसी कायम ठेवल्यानंतर दोन बोनस मिळाल्यास तुम्हाला एकूण 37 लाख रुपये मिळू शकतात.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement