SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ परिस्थितीत मुलींना प्रॉपर्टीत हिस्सा नाही, वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलींचे अधिकार कोणते.?

देशात काय तर जगातच मालमत्ता म्हटलं की वाद हे होतातच. घराघरांमध्ये भांडणं होऊन सख्खे भाऊ या वादावरुन एकमेकांच्या विरोधी जातात. आता भारतात मुलींना मालमत्तेत किती अधिकार आहे आणि मुलींना वडिलांच्या मालमत्तेत वाटा कधी मिळत नाही याबाबत जाणून घ्या..

मालमत्तेचे दोन प्रकार

Advertisement

स्व-अधिग्रहित मालमत्ता: एक अशी मालमत्ता आहे जी व्यक्तीने स्वतः मिळवली आहे. मग ती एखाद्या व्यक्तीने विकत घेतली असेल, ती धर्मादाय स्वरूपात प्राप्त झाली असेल किंवा एखाद्या व्यक्तीचे हक्क सोडल्याच्या परिणामी प्राप्त झाली असेल, बक्षीस म्हणून प्राप्त झाली असेल, या सर्व मालमत्तेला स्व-अधिग्रहित मालमत्ता असंही म्हणतात.

जेव्हा एखादी व्यक्ती स्वतः मालमत्ता घेते तेव्हा त्या व्यक्तीला तिच्या मालमत्तेबाबत कोणताही निर्णय घेण्याचा अनन्य अधिकार असतो. भारतीय उत्तराधिकार कायदा, मालमत्ता हस्तांतरण कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला त्याच्या मालमत्तेबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.
आता त्यांना मुले असली तरी कोणताही निर्णय घ्यायला त्यांना कोणीही भाग पाडू शकत नाही.

Advertisement

वडिलोपार्जित मालमत्ता: दुसरी मालमत्ता आहे जी एखाद्या व्यक्तीची वडिलोपार्जित मालमत्ता आहे. वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे जी पिढ्यानपिढ्या पुढे जात असते. सामान्यत: काही लोकांकडे अशी वडिलोपार्जित मालमत्ता असते जी अनेक वर्षांपासून त्यांच्या पिढ्यांना मिळत आलेली आहे. या मालमत्तेमध्ये एखाद्या व्यक्तीची मुले हक्क मागू शकतात.

मुलींचे वडिलांच्या मालमत्तेत हक्क कोणते?

Advertisement

वडिलांच्या मृत्यूनंतरच मुलगी आणि मुलाला मालमत्तेत वडीलानंतर हक्क मिळतो. त्यातसुद्धा जर वडिलांनी जर आपली संपत्ती आपल्या स्वतःच्या मृत्यूनंतर कोणाच्या नावावर करायची द्यायाची हे ठरवले असेल किंवा तसे कागदपत्र तयार केले असेल तर यामध्ये काहीही बदल होणे शक्य नाही. परंतु जर वडिलांनी अशी कोणतीही कागदपत्रे तयार केलेली नसतील, तर त्यांच्या मुलांना म्हणजेच मुलगा किंवा मुलीला ती मालमत्ता मिळते. कोणत्याही मालमत्तेत जितका अधिकार मुलाला मिळतो तितकाच हक्क मुलीला देखील मिळतो.

मुलीचे लग्न झाल्यावर तिच्या पतीच्या मालमत्तेत तिला हक्क मिळालाय, अशी बाजू मुलगा घेऊ शकत नाही, मुलगा काहीही म्हणू शकत नाही. समजा जर मुलीच्या वडिलांनी मालमत्तेबाबत कोणतीही व्यवस्था केली नसेल आणि मृत्यू पावले तर मुलीचा तिच्या वडिलांच्या अधिग्रहित मालमत्तेवर हक्क असतो. या प्रकरणी न्यायालयात सिद्ध झालं की, ती संपत्ती तुमच्या वडिलांनी स्वत: मिळवली होती, तर मुलीला मालमत्तेत समान वाटा दिला जातो आणि अशी संपत्ती ही मुलीला मिळालेली संपत्ती मानली जाते.

Advertisement

वडिलोपार्जित मालमत्ता आणि मुलींचा हक्क

वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे पूर्वजांकडून मिळालेली मालमत्ता. मुलींचे लग्न दुसऱ्या ठिकाणी होते, अशा परिस्थितीत त्यांचे हक्क फार कमी असतात. वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत एक ते दोन पिढ्यांनंतर मुलींचे हक्क जवळजवळ कमी होत जातात. सध्या 2005 मध्ये हिंदू उत्तराधिकार कायद्यात काही बदल करून वडिलोपार्जित मालमत्तेत मुलीला मुलांइतकाच हक्क मिळतोय. मग त्या मुलीचं लग्न झालेलं असेल तरी तिचा अधिकार तुम्ही नाकारु शकत नाही.

Advertisement

कोणत्या परिस्थितीत मुलींना अधिकार नाही..?

1. जर एखाद्या मुलीने तिच्या वारसा हक्काचा त्याग केला असेल, तर तिला मिळणाऱ्या वडिलांच्या स्वकष्टार्जित मालमत्ता किंवा वडिलांनी स्वतंत्रपणे मिळवलेल्या मालमत्तेत कोणताही हक्क मिळत नाही. जर मुलीने तिचा वाटा/हिस्सा स्वतःहून सोडला आणि रिलीझ डीडवर तिची स्वाक्षरी असेल आणि त्या कागदपत्राची नोंद झाली असेल. तर त्यावर मुलीचा कोणताही अधिकार राहणार नाही.

Advertisement

2. जर मुलीच्या वडिलांनी त्यांनी स्वत: मिळवलेल्या कोणत्याही मालमत्तेसाठी मृत्युपत्रात मुलाच्या नावे मालमत्ता लिहून त्यातून मुलींना पूर्णपणे नाकारलं असेल आणि मृत्युपत्राची नोंद झाली असेल, तर वडिलांच्या मृत्यूनंतर मुलींना मालमत्तेत कोणताही अधिकार मिळत नाही. मग मुलगी कोर्टात जाऊनही हक्क मागू शकत नाही कारण वडिलांनी तिला त्यामधून बेदखल केलेलं आहे, असं म्हणता येईल. यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की, वडील स्वत: घेतलेली मालमत्तेचेच मृत्युपत्र करू शकतात, ते वडिलोपार्जित संपत्तीबाबत कोणतेही मृत्युपत्र करू शकत नाही ती व्यक्ती आपल्या मुलीचा हक्क हिसकावून घेऊ शकत नाही.

(नोंद घ्या: हा लेख इंटरनेटवर उपलब्ध सामान्य माहीतीवर आधारित आहे. आपण सविस्तर माहीतीसाठी कायद्यांचा अभ्यास करा किंवा वकिलांचा सल्ला घेऊन अधिक माहीती घ्या.)
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement