SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मित्राला वाढदिवसानिमित्त थेट चंद्रावर दिली 1 एकर जमीन… नाशिकमधील जिगरी दोस्तांची अनोखी कहाणी..!

निस्वार्थ प्रेम म्हणजे मैत्री.. मित्रप्रेमाचे अनेक किस्से चित्रपट, मालिका ते पुस्तकांमधून पाहायला, वाचायला मिळतात. कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचं नातं सरस ठरतं.. नाशिक जिल्ह्यातील दोन मित्रांच्या अनोख्या मैत्रीचा असाच एक किस्सा सध्या साेशल मीडियातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे..

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील दोन जिगरी दोस्तांची मैत्री सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलीय. अर्थात, त्याला कारणही तसेच आहे. नेमकी ही काय कहाणी आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

वैद्यकीय शिक्षण घेणारा रूपेश हरिश्चंद्र नाठे नि डॉ. ऋषीकेश प्रदीप मुधळे, अशी या जिगरी दोस्तांची नावे.. नुकताच रुपेश नाठे याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.. आपल्या या मित्राला का गिफ्ट द्यावं, असा विचार डाॅ. ऋषिकेशच्या मनात आला.. काही तरी जगावेगळं करण्याचा निर्णय त्याने केला नि चक्क थेट चंद्रावरील 1 एकर जमीन रुपेशला गिफ्ट म्हणून दिली.

जमिनीची रितसर खरेदी
इंटरनॅशनल लुनार लॅण्ड्स अथॉरिटी यांच्याकडे चंद्रावरील जमीन खरेदीची कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात आली आहे.. या नोंदणीच्या कागदपत्रांसोबतच जागेचा नकाशा व बोर्डीग पासदेखील रुपेशला देण्यात आला आहे. ‘इंटरनॅशनल लुनार लॅण्ड्स अथॉरिटी’मध्ये चंद्रावरील एक एकर जमीन खरेदीची रितसर नोंद झाल्याचे रुपेशने सांगितले.

Advertisement

सुशांतसिंहचीही चंद्रावर जमीन
अर्थात.. चंद्रावर जमीन घेणारा रुपेश काही पहिलीच व्यक्ती नाही बरं का.. यापूर्वी बॉलीवूडमधील दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपुत यानेही चंद्रावर जागा खरेदी केल्याचे सांगितले जाते.. अर्थात, मित्राला वाढदिवसाला थेट चंद्रावर जमीन गिफ्ट देण्याची ही बहुदा पहिलीच घटना असावी..

रुपेश नाठे सध्या वैद्यकीय शिक्षण घेतो. गोंदे येथून त्याने महाराष्ट्रात प्रथमच छत्रपती शिवरायांची पालखी सुरू केली. शिवाय विविध सामाजिक कामांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग असतो. त्याच्या कामाची पोचपावती म्हणून मित्र डॉ. मुधळे व त्याच्या परिवाराने ही अनोखी भेट दिल्याचे सांगण्यात आले..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

 

Advertisement