SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): सुख-समृद्धीचे शुभ संयोग घडतील. मन प्रसन्न राहील आणि परस्पर प्रेम अधिक दृढ होईल. अनेक प्रश्नांची उकल काढता येईल. स्वत:साठी वेळ काढावा. तज्ञ लोकांशी संपर्क साधावा. मानसिक दृष्ट्‍या सक्षम व्हाल.

वृषभ (Taurus): संवादातून प्रश्न सोडवता आले तर बरे होईल. तुमची आणि तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत चिंता वाढू शकते. बाहेरील गोड पदार्थ खाणे टाळावे. स्त्रीवर्गाशी जरा जपून वागावे. धार्मिक कामात सहभागी व्हाल.

मिथुन (Gemini) : तुमच्या जोडीदाराचे तुम्हाला जितके अपेक्षीत लक्ष हवे आहे, या आठवड्यात तुम्हाला त्यात कमतरता जाणवू शकते आणि ते तुमच्यासाठी निराशेचे कारण बनू शकते. सहकाऱ्यांशी सामंजस्याने वागावे. यशाने उगाचच हुरळून जाऊ नका.

Advertisementकर्क (Cancer) : तुम्हाला तुमच्या जॉबसंबंधी काही आनंददायी बातम्या देखील मिळतील आणि तुमचे मन प्रसन्न राहील. नवविवाहिताना सरप्राइज मिळेल. व्यवसायिकांना चांगला फायदा मिळेल. वरिष्ठांकडून दाद मिळेल. चार-चौघात कौतुक केले जाईल.

सिंह (Leo) : तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगल्या ठिकाणी जाण्याचा विचार करू शकता. आठवड्याच्या शेवटी गोष्टी तुमच्यासाठी अनुकूल होतील आणि मन प्रसन्न राहील. छुपे शत्रू त्रास देऊ शकतात.

कन्या (Virgo) : तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा निर्णय देखील घेऊ शकता. देणी फेडता येतील. तसेच नवीन गुंतवणूक करता येईल. शब्द, पैसा आणि वेळ यांचे महत्त्व ओळखणे हिताचे.

Advertisement


तुळ (Libra) : तुमच्‍या जोडीदाराचे तुमच्याकडे लक्ष नाही असे तुम्‍हाला वाटेल, तुमचे मन उदास राहील. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. घाईपेक्षा संयम लाभदायी ठरेल. दिवस चांगला आहे. आर्थिक प्रश्न मार्गी लागेल.

वृश्‍चिक (Scorpio) : व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस फलदायी असेल. नवीन संधी चालून येईल. वास्तवाचे आणि व्यावहारिकतेचे भान राखून प्रगती कराल. प्रामाणिकपणा, प्रयत्नांमधील सातत्य यामुळे यश लाभेल.

धनु (Sagittarius) : नवीन आव्हान स्वीकारता येईल. तुमची एकाग्रता वाढेल. जोडीदाराला खुश ठेवता येईल. जमिनीशी संबंधित व्यवहार पार पडेल. सहकाऱ्यांची साथ लाभेल. प्रगतीचे योग आहेत. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.

Advertisementमकर (Capricorn) : कौटुंबिक जीवनात शुभ परिणाम पहायला मिळतील. घरातील लोकांसोबत चांगला वेळ घालवाल. बोलण्यात गोडवा ठेवाल. आवडीच्या गोष्टी कराल. कधी मौन राखावे हे जमले तर यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल.

कुंभ (Aquarious) : साफसफाईची कामे काढाल. मन प्रसन्न राहील. पराक्रमात वाढ होईल. तुमची ऊर्जा पाहून लोक अचंबित होतील. बुद्धीच्या जोरावर नवीन कामे कराल. दिवस मनाजोगा घालवाल. आर्थिक व्यवहार करताना पूर्ण खात्री करुन घेणे लाभाचे असते.

मीन (Pisces) : सहकारी वर्ग तुमच्यावर प्रभावित होईल. कामासंबंधी प्रवास करावा लागेल. कष्ट करणाऱ्याला यश मिळेल. अडचणींमधून मार्ग निघेल. कौटुंबिक सुख लाभेल. ओळखीचे लोक भेटतील. आवडते छंद जोपासाल.

Advertisement