बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आता आगामी ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाच्या टीझरमध्ये अमिताभ बच्चन हे प्रशिक्षकाच्या लूकमध्ये झळकत आहे. बिग बी यांचा ‘अँग्री यंग मॅन’ लुक या चित्रपटामधून पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, असं टीझर पाहून समजत आहे.
‘झुंड’ कधी होणार प्रदर्शित…?
झुंड चित्रपटाचे कथानकाविषयी उत्सुकता असून या टीझरमध्ये अमिताभ यांच्यासोबतच काही लहान मुलेही दिसत आहेत. या सर्वांची टीम पुढील महिन्यात 4 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नागराज मंजुळे यांनी हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता या टिझरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती येत आहे.
नागराज मंजुळे यांनी शेअर केलेला ‘झुंड’चा टिझर पाहा 👉
फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. झुंड चित्रपटाचे कथानक हे विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकांच्या आयुष्यावर आहे. एकंदरीत चित्रपटाचा टीझर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. सभोवतालीच्या गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांना तयार करून त्यांनी आपली फुटबॉल टीम तयार केली होती. त्याभोवती कथानकावर ‘झुंड’ हा चित्रपट असल्याचं सांगण्यात येतंय. गेल्या वर्षी 18 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता पण नंतर या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात येऊन हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit