SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार, असं करा ऑनलाईन डाऊनलोड..!

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे.. कोरोना संसर्ग कमी झाल्याने यंदा ऑफलाईन पद्धतीने बारावीची बोर्डाची परीक्षा होणार आहे.. अर्थात काही विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षांना विरोध केला आहे. मात्र, राज्य सरकार यंदा ऑफलाईन परीक्षा घेण्यावर ठाम आहे. याआधी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, येत्या मार्चमध्ये ही परीक्षा होणार आहे.

महाराष्ट्र स्टेट बाेर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा 15 मार्चपासून, तर बारावीच्या परीक्षेला 4 मार्चपासून सुरुवात होणार आहे. दहावीच्या आधी बारावीची परीक्षा सुरू होणार आहे..

Advertisement

दरम्यान, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी उद्या (बुधवारी) दुपारी एक वाजेपासून बोर्डाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे ‘हॉल तिकीट’ उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले.

राज्य शिक्षण मंडळाने एक परिपत्रक जारी करुन राज्यातील सर्व महाविद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांना या प्रवेशपत्राबाबत सूचित केलं आहे. त्यानुसार, 9 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 1.00 वाजेपासून बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट बोर्डाच्या ऑफिशिअल वेबसाइटवरून डाउनलोड करावे लागणार आहे..

Advertisement

विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटाची प्रिंट काढून देण्याचे काम संबंधित महाविद्यालयांनी करायचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. हॉल तिकिटावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांचा शिक्का मारावा लागेल.. विद्यार्थ्यांच्या नावात वा इतर माहितीत काही चूक आढळल्यास महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना मदत करायची आहे.

हाॅल तिकीटावर विद्यार्थ्याचा फोटो चुकीचा आला असल्यास विद्यार्थ्यांनी त्यावर आपला पासपोर्ट फोटो चिकटवून त्यावर मुख्याध्यापकांची सही घेणं आवश्यक आहे.

Advertisement

असं करा डाऊनलोड?
सर्वात आधी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर जा. त्यानंतर ‘काॅलेज लाॅगिन'(College login) या पर्यायावर क्लिक करुन विद्यार्थ्यांना आपले हॉल तिकीट ऑनलाइन डाउनलोड करता येणार आहे..

दरम्यान, हॉल तिकीटात विषय वा माध्यम बदलाबाबत काही दुरुस्ती असल्यास शाळा-महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन त्या दुरुस्त कराव्यात. हॉल तिकीटावर विद्यार्थ्याचा फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव यातील दुरुस्तीबाबत महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर फक्त त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे.

Advertisement

तसेच, विद्यार्थ्यांकडून हॉल टिकीट हरवल्यास संबंधित शाळा-महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने ‘द्वितीय प्रत’ (डुप्लिकेट)असा शेरा टाकून विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यायचे आहे.

बारावी परीक्षेचा सविस्तर वेळापत्रक

Advertisement
 • 4 मार्च – इंग्रजी
 • 5 मार्च – हिंदी
 • 7 मार्च – मराठी, गुजराती, बंगाली, तेलगू, पंजाबी, तमिळ
 • 8 मार्च – संस्कृत
 • 10 मार्च – फिजिक्स
 • 12 मार्च – केमिस्ट्री
 • 14 मार्च – मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स
 • 17 मार्च – बायोलॉजी
 • 19 मार्च – जियोलॉजी
 • 9 मार्च-  ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट
 • 11 मार्च – सेक्रेटरीयल प्रॅक्टिस
 • 12 मार्च – राज्यशास्त्र
 • 12 मार्च – अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर 1
 • 14 मार्च – अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर 2
 • 19 मार्च – अर्थशास्त्र
 • 21 मार्च – बुक किपिंग अँड अकाउंटन्सी
 • 23 मार्च – बँकिंग पेपर – 1
 • 25 मार्च – बँकिंग पेपर – 2
 • 26 मार्च – भूगोल
 • 28 मार्च – इतिहास
 • 30 मार्च – समाजशास्त्र

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement