SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘व्हॅलेंटाइन वीक’ला सुरुवात, आठवड्यातील ‘स्पेशल-डे’बाबत जाणून घ्या..!

14 फेब्रुवारी.. व्हॅलेंटाईन डे.. आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल प्रेम व्यक्त करण्याच खास दिवस.. मात्र, या दिवसाच्या आधीपासूनच नियोजन केले जाते.. आज (ता. 7) ‘रोज डे’.. आजपासूनच ‘व्हॅलेंटाइन वीक’ला सुरुवात झालीय.. त्यानंतर आठवडाभर कोणते खास दिवस असतील, याबाबत जाणून घेऊ या..!

‘व्हॅलेंटाइन वीक’बाबत..
7 फेब्रुवारी : रोज डे – आपल्या प्रिय व्यक्तीला लाल गुलाबाचं फूल देऊन या दिवशी प्रेम व्यक्त केलं जातं. हा दिवस खास बनवण्यासाठी तुम्ही जोडीदाराला फूल किंवा पुष्पगुच्छ देऊ शकता.
▪️ 8 फेब्रुवारी : प्रपोज डे – प्रपोज करण्यासाठी हा सर्वोत्तम दिवस असल्याचं म्हटलं जातं. एखाद्या रोमँटिक ठिकाणी प्रपोज करू शकता. व्हिडीओ कॉलवरही तुमच्या भावना व्यक्त करू शकता.

Advertisement

▪️ 9 फेब्रुवारी : चॉकलेट डे – प्रिय व्यक्तीला चॉकलेट देऊन तुम्ही हा दिवस खास बनवू शकता. तुम्ही स्वत: चॉकलेट तयार केले असेल, तर प्रिय व्यक्तीला जास्त आनंद वाटेल.
▪️ 10 फेब्रुवारी : टेडी डे – प्रिय व्यक्तीला या दिवशी ‘टेडी’ भेट म्हणून द्यायचा असतो. शक्यतो गुलाबी किंवा लाल रंगाचा ‘टेडी’ मुलींना जास्त आवडतात.

▪️ 11 फेब्रुवारी : प्रॉमिस डे – एकमेकांना वचन देण्याचा नि ती पाळण्याचा हा दिवस. वचन देताना आत्मविश्वासाने द्या.
▪️ 12 फेब्रुवारी : हग डे – व्हॅलेंटाईन वीकमध्ये तुम्ही जोडीदाराला प्रेमळ मिठी देऊन प्रेम व्यक्त करू शकता.
▪️ 13 फेब्रुवारी : किस डे – व्हॅलेंटाइन विकमधील हा सहावा दिवस.. अनेक जण प्रेमभावनेने या दिवसाकडे पाहतात.
▪️ 14 फेब्रुवारी : व्हॅलेंटाइन डे – या दिवशी तुम्ही जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. तुमचं प्रेम व्यक्त करू शकता.

Advertisement