SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. जिद्दीने कार्यरत राहाल. भागीदारीत फार विसंबून राहू नका. आजचा अंतिम निर्णय तुमचा असेल. जुगारापासून सावध राहावे. एकावेळी अनेक कामे हाताळू नका.

वृषभ (Taurus): नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. खर्च वाढेल. कार्यक्षेत्रात काम होतील. उगाच उदास होऊ नका. कोणावरही अति विश्वास ठेऊ नका. मतभेदाला बळी पडू नका.

मिथुन (Gemini) : राजकारण आणि कलेची उंची गाठली. अनेक चांगले डॉक्टर आणि वकील आहेत. जोडीदाराची साथ लाभेल. नवीन संधी मिळतील. एखादे चांगले पुस्तक वाचनात येईल. नवीन मार्गांचा विचार कराल.

Advertisementकर्क (Cancer) : गुरुकृपा लाभेल. आर्थिक सुयश लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. शैक्षणिक अडचणी दूर होतील. काही नवीन खरेदी करता येईल. घरात टापटीप ठेवाल. जोडीदारासाठी काही खरेदी करणं गरजेचं वाटेल.

सिंह (Leo) : बँकिंग किंवा मॅनेजमेंटच्या नोकरीत बदल किंवा बढती. खर्च करावा लागेल. प्रकृती सांभाळून राहा. संधी उपलब्ध होतील. दुचाकी वाहन जपून चालवावे. शंकेचे समाधान करून घ्याल. नसते साहस दाखवायला जाऊ नका.

कन्या (Virgo) : दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मानसिकदृष्ट्या कठीण जाईल. खर्च बेताने करा. मोकळ्या स्वभावाने लोकांचे मन जिंकाल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. जुन्या कामातून लाभ संभवतो.

Advertisementतुळ (Libra) : जमीन, घर किंवा वाहन खरेदीची शक्यता आहे. इच्छे विरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. अति दगदग टाळा. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता. व्यवसायिकांनी नवीन धोरण आखायला हरकत नाही.

वृश्‍चिक (Scorpio) : काहींची वैचारिक प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल. बुद्धीचा नाहक व्यय मार्ग ना सापडणं असं फळ देईल. चोरी किंवा नुकसान संभवतं. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. आपलेच मत खरे कराल.

धनु (Sagittarius) : कलाकारांना शुभ फळ देईल. हे वर्ष तुमच्या करिअरसाठी खूप चांगले असेल. स्थान बदल आणि बढतीचा योगायोग होईल. चित्त स्थिर ठेवावे. कार्यालयीन कामात गोंधळ उडू शकतो. आवडता छंद पूर्ण करता येईल.

Advertisementमकर (Capricorn) : आर्थिक ताण देईल. प्रवास योग येतील. नातेवाईकांशी मन मोकळेपणाने बोलाल. सकारात्मक विचारांची जोड घ्यावी. तुमच्या बुद्धी चातुर्याने मार्ग मोकळे होतील. उगाचच निराश होऊ नका.

कुंभ (Aquarious) : कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आज ऑफिसमध्ये भरपूर काम करावं लागणार आहे. आनंददायी अनुभव येतील. नातेवाईकांची भेट आनंद देणारी असेल. आध्यात्मिक प्रगती करता येईल.

मीन (Pisces) : आजचा दिवस सामान्य असेल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता. भावांकडून मदत मिळेल. कोणावरही विसंबून राहू नका. शब्द जपून वापरा. खर्चावर नियंत्रण ठेवावे. कामात वडीलांचे सहकार्य मिळेल. मोहाला बळी पडू नका.

Advertisement