SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आज सार्वजनिक सुट्टी, पण राज्यातील बँका चालू राहणार का?

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. चित्रपट नगरीला नेहमीच मोलाचं मार्गदर्शन आणि योगदान देणाऱ्या या गाणकोकिळेसाठी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.

मग काय सुरू राहणार?

Advertisement

▪️ आज राज्यभरातील शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. आज सार्वजनिक सुट्टी असली तरी आज बीएसई म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (Bombay stock exchange) चालू राहणार आहे.

▪️ बँकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर, सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली असली तरी एसबीआय (SBI), बँक ऑफ इंडिया (BOI) सारख्या सरकारी आणि खासगी बँका या केंद्र सरकारच्या म्हणजेच आरबीआयच्या अखत्यारित येतात. यामुळे राज्याने घेतलेले निर्णय त्यांच्यावर लागू होत नाहीत.

Advertisement

▪️ राज्य सरकारने घेतलेले निर्णय राष्ट्रीय बँकांनाही त्या राज्यापुरते लागू होतात. यामुळे आज 7 फेब्रुवारी बँका सुरु राहणार आहेत की बंद राहणार (Bank Holiday) याबाबत लोकांच्या मनात प्रश्न होते. यावर आरबीआयने उत्तर देत लोकांमधील शंका दूर केली आहे.

▪️ महाराष्ट्र वगळता देशभरातील बँका आज सुरुच राहणार आहे. फक्त महाराष्ट्रातील बँका, वित्तीय संस्था बंद राहणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. तसेच जे कोणतेही व्यवहार पेंडिंग असतील ते 8 फेब्रुवारीला लोकांना करावे लागतील, असेही आरबीआयने म्हटले आहे.

Advertisement

▪️ महाराष्ट्र शासनाने 7 फेब्रुवारीला सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केल्यामुळे, सरकारी सिक्युरिटीज (प्राथमिक आणि दुय्यम), परकीय चलन, मुद्रा बाजार व रुपया व्याजदर डेरिव्हेटिव्ह्जमध्ये कोणतेही व्यवहार आणि सेटलमेंट होणार नाहीत असे आरबीआयने म्हटले आहे. आता हे सर्व थकित व्यवहारांचे सेटलमेंट 8 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलले जाणार असल्याचे RBI ने एका निवेदनात म्हटलं आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement