SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘जिओ’चा सर्वात स्वस्त लॅपटाॅप येणार..! ग्राहकांना मिळणार जबरदस्त फिचर्स..

ग्राहकांना स्वस्तात मस्त सेवा देणाऱ्या ‘रिलायन्स जिओ’ने’ टेलिकाॅम क्षेत्रात धुमाकूळ घातलाय.. सध्याच्या घडीला भारतात सर्वाधिक ग्राहक ‘जिओ’चे आहेत. ‘टेलिकम्युनिकेशन’मध्ये नंबर वन झाल्यानंतर आता ‘रिलायन्स जिओ’ नव्या क्षेत्रात आपले पाऊल ठेवणार आहे.

‘रिलायन्स जिओ’ आता लॅपटॉपची निर्मिती करीत आहे.. ‘जिओ’चा हा पहिला लॅपटॉप जिओ बूक (Jio Book) लवकरच भारतीय बाजारात लाॅंच केला जाणार आहे.. आणि अर्थातच ‘जिओ’ फोनप्रमाणे हा लॅपटाॅपही ग्राहकांना स्वस्तातच उपलब्ध होणार असल्याची चर्चा आहे.

Advertisement

मागील अनेक दिवसांपासून ‘रिलायन्स जिओ’ आपल्या या लॅपटॉपवर काम करीत आहे. ‘जिओ बूक’ लॅपटाॅपच्या हार्डवेअरला परवानगी मिळाल्याची माहिती मिळाली.. त्यामुळे भारतीय बाजारात ‘जिओ’चा लॅपटॉप लवकरच ‘एंन्ट्री’ करणार असल्याचे बोलले जात आहे..

टिप्स्टर मुकुल शर्मा यांनी ‘जिओ बूक’च्या लिस्टिंगबाबत माहिती दिली. लिस्टिंगमध्ये कंपनीचे नाव ‘Emdoor Digital Technology Co LTD’ असे दाखविलेय. याचा अर्थ वेंन्डरकडून प्राॅडक्ट खरेदी करून स्वतःच्या ब्रँड अंतर्गत ‘जिओ’ या लॅपटाॅपची विक्री करण्याची शक्यता आहे.

Advertisement

लेटेस्ट ‘विंडोज-11’ ओएसवर जिओ काम करीत आहे… अंतिम प्राॅडक्टमध्ये लेटेस्ट ओएस दिला जाऊ शकतो.. त्याला ‘बीआयएस’ (BIS) सर्टिफिकेट मिळाले आहे…

संभाव्य वैशिष्ट्ये
– सध्या जिओ लॅपटॉपच्या स्पेसिफिकेशन्सबाबत कोणताही खुलासा झालेला नाही. मात्र, लिस्टिंगनुसार लॅपटॉपमध्ये अँड्राइड-11 ओएस असेल. मात्र, विक्रीच्या वेळी लॅपटॉपमध्ये वेगळे व्हर्जनही पाहायला मिळू शकते. सध्या हे टेस्टिंग फेजमध्ये असेल.
– जिओ लॅपटॉपने सिंगल-कोअर टेस्टमध्ये 1178, तर मल्टी-कोअर टेस्टमध्ये 4246 स्कोअर मिळवला होता. ‘जिओ बुक’मध्ये मीडिया टेक MT8788 चिपसेट दिला जाऊ शकतो. सोबत 2 जीबी रॅम मिळेल.
– कंपनीने या लॅपटाॅपच्या लाँचिंगच्या तारखेबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु लवकरच भारतीय बाजारात हा लॅपटाॅप दिसू शकेल..

Advertisement

– शिवाय जिओ बूकमध्ये 4G कनेक्टिव्हिटी मिळेल. जिओ लॅपटॉपमध्ये ‘फोर्क्ड अॅंड्रॉयड असणार, त्याला ‘जिओ ओएस’ म्हणून ओळखले जाईल. जिओचे सर्व अॅप्स या लॅपटॉपमध्ये असतील.

किंमतीबाबत..
टेलिकाॅम क्षेत्रात ‘जिओ’ने सर्वात स्वस्त सेवा सुरु केली. तसेच सर्वात स्वस्त फोनही आला आहे. त्यामुळे हा लॅपटाॅपही सध्याच्या इतर कंपन्यांच्या लॅपटाॅपच्या तुलनेत स्वस्त असणार, हे निश्चित आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आलेल्या एका रिपोर्टनुसार, ‘जिओ बूक’ लॅपटाॅपची सुरुवातीची किंमत 9,999 रुपये असेल, असे म्हटले होते.

Advertisement

शाओमी, डेल, लिनोवो आणि या सेगमेंटमधील अन्य लॅपटॉपसमोर जिओ बूक लॅपटाॅपमुळे मोठी स्पर्धा होणार आहे. अन्य कंपन्यांनाही आपल्या लॅपटाॅपच्या किंमती कमी कराव्या लागू शकतात. त्यामुळे ग्राहकांचा मात्र फायदा होणार असल्याचे सांगितले जाते.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी क्लिक करा 

Advertisement