सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. येत्या होळीपूर्वी केंद्रिय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकार मोठी घोषणा करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले..
मोदी सरकारने दिवाळीच्या दिवशी केंद्रिय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 3 टक्क्यांची वाढ केली होती. त्यानंतर तीन महिन्यांतच पुन्हा एकदा महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ केली जाणार असून, एकूण महागाई भत्ता 34 टक्क्यांवर जाणार आहे.. एवढेच नाही, तर केंद्र सरकार ‘डीए’सोबत घरभाडे भत्त्यातही (HRA) मोठी वाढ करण्याच्या विचारात आहे.
महागाई भत्त्यासाठी सरासरी 12 महिन्यांचा निर्देशांक सरासरी 34.04 टक्के (महागाई भत्ता) आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यापासूनच एकूण महागाई भत्ता 34 टक्के मिळणार आहे. त्यानंतर देशभरातील 11.56 लाख कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता वाढविण्याचा केंद्रिय अर्थ मंत्रालयाचा विचार आहे..
1 जानेवारी 2021 पासून नवा एचआरए (HRA) लागू करण्याची मागणी भारतीय रेल्वे तांत्रिक पर्यवेक्षक संघटना व नॅशनल फेडरेशन ऑफ रेल्वेमेन करीत आहेत. त्यानुसार रेल्वे बोर्डाकडे प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास कर्मचाऱ्यांचा ‘एचआरए’ वाढणार असून, पगारात बंपर वाढ होणार आहे.
‘एचआरए’मध्ये किती वाढ होणार.?
घरभाडे भत्ता शहरातील लोकसंख्येच्या आधारे दिला जातो. त्यानुसार, शहराची लोकसंख्या 50 लाखांपेक्षा जास्त असल्यास एक्स (X) श्रेणीत, 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणारी शहरे वाय (Y) श्रेणीत, तर 5 लाखांपेक्षा कमी लोकसंख्येची शहरे झेड (Z) श्रेणीत येतात.
तिन्ही श्रेणींसाठी किमान ‘एचआरए’ अनुक्रमे 5400, 3600 आणि 1800 रुपये असणार आहे. महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत वाढेल, तेव्हा कमाल घरभाडे भत्ता 30 टक्क्यांपर्यंत वाढू शकेल. सरकारच्या जुन्या आदेशानुसार, ‘डीए’ 50 टक्के मर्यादा ओलांडली, तर ‘एचआरए’मध्ये 30 टक्के, 20 टक्के व 10 टक्के असणार आहे.