SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकींग: रोहित शर्माची तुफान फलंदाजी, भारताने वेस्ट इंडिजला चारली पराभवाची धूळ..

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या वनडे सीरिजला (India vs West Indies ODI Series) सुरूवात झाली आहे. काल (6 फेब्रुवारी) पहिल्या वनडे सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला 6 गड्यांनी सहज धूळ चारली आहे. टीम इंडियाचा हा 1000वा वनडे सामना (team india 1000th match) होता आणि भारतीय संघात छोटासा बदल असा की रोहित शर्मा कॅप्टन म्हणून मैदानात उतरला.

वेस्ट इंडिजचा डाव:

Advertisement

भारताने आपली विजयी सुरू सुरुवात टॉसपासून सुरू करून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यांच्या प्रभावी माऱ्यापुढे वेस्ट इंडिजने 176 धावांवर आपला डाव 43.5 षटकातच आटोपला.

वेस्ट इंडीजकडून शाई होप आणि ब्रँडन किंग यांनी सलामी दिली. होप (8), ब्रँडन किंग (13), ब्राव्हो (18), शमारह ब्रुक्स (12), निकोलस पूरन (18), आणि विंडीजचा कॅप्टन कायरन पोलार्ड (0) धावांवर बाद झाले. यानंतर अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर व फॅबियन एलन यांनी विंडीजचा डाव सावरला. 38व्या षटकात होल्डरने अर्धशतक पूर्ण केले तो 57 धावांवर बाद झाला. अल्झारी जोसेफ झेलबाद होत विंडीजचा डाव 43.5 षटकात 176 धावांवर संपला. टीम इंडियाकडून चहलने 49 धावांत 4 विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरला 3 विकेट्स, प्रसिध कृष्णाला 2 विकेट्स तर सिराजला 1 विकेट मिळाली.

Advertisement

भारताचा डाव:

वेस्ट इंडीजच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी 84 धावा करत चांगली सलामी दिली. रोहितने सुरेख फटकेबाजी करत 44वे अर्धशतक झळकावत 10 चौकार आणि 1 षटकारासह 60 धावांचं योगदान दिलं. रोहित बाद झाल्यावर विराट कोहली 8 धावांवर तर ऋषभ पंत 11 धावांवर बाद झाले. त्यानंतर दीपक हुडाच्या नाबाद 26 धावा आणि सुर्यकुमार यादवने नाबाद 34 धावांचं योगदान देऊन 28 षटकात भारताने वेस्ट इंडीजने दिलेले आव्हान पूर्ण करत 6 विकेट्सने विजय (india defeat west indies by 6 wickets) मिळवला.

Advertisement

दोन्ही संघात कोणाचा होता समावेश?

भारतीय टीम (team india): रोहित शर्मा, इशान किशन, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज

Advertisement

वेस्ट इंडिजची टीम (team west indies): ब्रेण्डन किंग, शाय होप, शेमराह ब्रुक्स, डॅरेन ब्राव्हो, निकोलस पूरन, कायरन पोलार्ड, जेसन होल्डर, फॅबियन एलन, अल्झारी जोसेफ, केमार रोच, अकील हुसैन
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 _तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा_

Advertisement