SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आयुष्यात ऐश्वर्य-संपत्ती हवीय..? आचार्य चाणक्यांचे ‘हे’ मार्गदर्शन तुमचं जीवन बदलू शकते..!

महान पंडित आचार्य चाणक्य यांनी आयुष्यभर लोकांना आपल्या अनुभवांद्वारे मार्गदर्शन केले. सामाजिक-आर्थिक क्षेत्रात त्यांनी केलेले मार्गदर्शन आजही मोलाचे ठरते.. ‘चाणक्य नीति’ या नावाने ते ओळखले जाते. ‘चाणक्य नीति’तील गोष्टींचे अनुसरण केल्यास कोणतेही आव्हान तुम्ही स्वीकारु शकता. त्यात यश मिळवू शकता..

आयुष्यात प्रत्येक जण संपत्ती कमावण्यासाठी धडपड करतो.. त्यासाठी दिवस रात्र राबतो.. मात्र, खूप कष्ट करुनही अनेकांच्या हाती यश काही लागत नाही.. जीवनात यश मिळवण्यासाठी ‘चाणक्य नीति’मध्ये मोलाची माहिती देण्यात आली आहे..

Advertisement

‘चाणक्य नीति’मध्ये (Chanakya Niti) कर्माला मोठे महत्व दिले आहे.. मोठे होण्यासाठी तुम्हाला मोठे काम करावे लागेल. तुमचे कर्मच तुम्हाला मोठे बनवेल. त्यासाठी मोठा त्याग करण्याची तयारी ठेवावी लागेल.. आचार्य चाणक्यांनी कर्माविषयी सांगितलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊ या..

चाणक्य काय म्हणतात..?
– आचार्य चाणक्य यांच्या मते जीवनातील सर्वात महत्वाचे कर्म म्हणजे, दान… तुम्ही लोकांना किती मदत करता, हे महत्वाचे.. परोपकाराचे महत्त्व समजून घ्यायचे असेल, तर मधमाशांकडे पाहा.. त्या सर्व मध गोळा करतात. पण शेवटी हा सगळा मध दुसऱ्यांनाच मिळतो..

Advertisement

– फक्त स्वतःसाठी जगणारा माणूस कधीही सुखी राहू शकत नाही नि इतरांनाही तो आनंदी ठेवू शकत नाही. शेवटी तो सर्व काही गमावतो.

– चांगुलपणा माणसाच्या स्वभावात असतो. तो कोणामध्ये टाकला जाऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीचे शब्द, आचरण, धैर्य, सद्गुण आणि औदार्य स्वभावातच असते.

Advertisement

– फसवणूक करणारा हा अधार्मिक राजासारखा असतो. जो फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतो. आपला समाज सोडून इतर समाजात मिसळतो. अशी व्यक्ती स्वतःच स्वतःचे नुकसान करीत असल्याचे चाणक्य म्हणतात.

– जीवनात यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास असायला हवा.. त्यासाठी स्वत:वर विश्वास ठेवायला हवा. आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही आयुष्यात खूप काही मिळवू शकता. तुमच्याकडे बुद्धिमत्ता असेल, पण आत्मविश्वास नसल्यास अशा ज्ञानाचा काहीच फायदा होत नाही.

Advertisement

– नोकरी किंवा व्यवसायात यश मिळविण्यासाठी आपल्या कामाबद्दल प्रामाणिक नि शिस्तबद्ध असले पाहिजे. कठोर परिश्रमाची भावना शिस्तीतून तयार होते, म्हणून यशस्वी होण्यासाठी आयुष्यात शिस्तीला फार महत्व असल्याचे ‘चाणक्य नीति’मध्ये सांगितले आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Advertisement