SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पीएम किसान योजनेच्या नियमांत मोठा बदल, ‘ही’ प्रक्रिया केल्यावरच मिळणार 11वा हप्ता…!

शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत केंद्र सरकारकडून 10 हप्ते जारी करण्यात आले असून, लवकरच या योजनेचा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे..

शेतीकामात गरीब शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी मोदी सरकारने ही योजना सुरु केली होती. त्यानुसार, देशातील 11 कोटींहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत असल्याचे सांगण्यात आले..

Advertisement

दरम्यान, गोरगरीब, गरजू शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरु केली होती. मात्र, बोगस कागदपत्रे सादर करुन अनेक बोगस लाेकांनी या योजनेचा लाभ घेतल्याची बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आली आहे. त्यावर निर्बंध घालण्यासाठी केंद्र सरकारने आता नवी नियमावली जारी केली आहे.

केंद्र सरकारच्या या नव्या नियमावलीनुसार, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ‘ई-केवायसी’ करावी लागणार आहे. त्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. याबाबत पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकतस्थळावर माहिती दिली आहे. ‘ई-केवायसी’ची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा 11 वा हप्ता मिळणार आहे.

Advertisement

आतापर्यंत राज्य सरकार व कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या यादीनुसारच शेतकऱ्यांच्या खात्यांवर पैसे जमा झाले. मात्र, आता ‘ई-केवायसी’ करणे बंधनकारक केले आहे.. 1 जानेवारी रोजा योजनेतील 10 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला. मात्र, आता ‘ई-केवायसी’ केल्याशिवाय 11वा हप्ता मिळणार नाही..

कसे करणार ‘ई-केवायसी’..?
-‘ई-केवायसी’ (eKYC) म्हणजे ‘electronic know your custumer’ अर्थात, एखाद्या व्यक्तीची इलेक्ट्रॉनिकली पडताळणी करणे.. ‘ई-केवायसी’ करण्यासाठी www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
– ‘ई-केवायसी’ करण्यासाठी दोन पर्याय दिसतील. एक म्हणजे तुमचा फोन नंबर हा आधार कार्डला लिंक असेल, तर तुम्ही आधार बेस केवायसी करू शकता. त्यासाठी ‘फार्मर कॉर्नर’मध्ये ‘केवायसी’वर क्लिक करा.
– नंतर ‘आधार केवायसी’ नावाने पेज तुमच्यासमोर येईल.. सुरुवातीला आधार क्रमांक, नंतर समोरच्या बॉक्समधील अक्षरे आणि अंक आहेत तशी टाकायची आहेत. त्यानंतर ‘सर्च’ पर्यायावर क्लिक करा.

Advertisement

– तुमच्यासमोर नवे पेज ओपन होईल. त्यात सुरुवातीला आधार नंबर दिसेल, त्यानंतर मोबाईल नंबर टाका.  नंतर गेट ओटीपी (Get Otp)वर क्लिक करा.
– मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून ‘submit for Auth’वर क्लिक करा. नंतर ‘EKYC is successful submitted’ असा मेसेज दिसेल. दरम्यान ‘invalid’ पर्याय दिसल्यास काही दिवसांनी परत ‘ई-केवायसी’ करा किंवा ‘सीएससी’ केंद्रावर कागदपत्रे जमा करून ‘ई-केवायसी’ करा.
– मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक नसल्यास ‘सीएससी’ केंद्रावर जाऊन कागदपत्र देऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Advertisement