SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

यूट्यूब आणणार धडाकेबाज फिचर्स, ‘या’ गोष्टी तुम्ही व्हिडीओ पाहातानाही करू शकणार

जगात काही वर्षांपासून मनोरंजन म्हटलं की सर्वात आधी यूट्यूबकडे पाहिलं जातं. आता सर्व प्रकारच्या जसे की, फेसबुक, इन्स्टाग्राम वगैरे सोशल मिडियाचाही वापर होतो. आपण मोबाईलवरूनच गाणी, चित्रपट पाहू शकतो असं तंत्रज्ञान आता नेक्स्ट लेव्हलला गेलं आहे. अनेक नवीन प्लॅटफॉर्म्स येत आहेत, जे लोकांच्या मनोरंजनाच्या दृष्टीने खूप विचार करून पाऊल टाकतात.

स्मार्टफोनच्या माध्यमातून ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रीमिंग करणं आपण यू-ट्यूबच्या माध्यमातून केलं असेल, हे आठवलं की आपल्याला समजेलच की, स्मार्टफोनचा सर्व प्रकारच्या गोष्टींसाठी, अनेक तऱ्हेने आपण वापर करतो.

Advertisement

जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रीमिंग ॲप्सपैकी बऱ्याच वर्षांपासून यूट्यूब आपल्या यूजर्ससाठी त्यांचा अनुभव अधिक चांगला करण्याचा प्रयत्न करत असते. अशीच काही चांगली फीचर्स आता यूट्यूब आणखी मनोरंजक बनवण्यासाठी आणत आहे. जाणून घेऊ..

यूट्यूबचे नवीन फीचर्स काय?

Advertisement

अँड्रॉइड (Android) आणि iOS यूजर्ससाठी आणि यूट्यूबने त्यांचे ॲप अपडेट केले आहे. Youtube App अपडेट केल्यानंतर आता युजर्सना ॲपवरील व्हिडीओंच्या फुल स्क्रीन मोडमध्ये (Youtube Full Screen Mode) अनेक फीचर्स मिळत आहेत. म्हणजेच आता पूर्ण स्क्रीनवर व्हिडीओ पाहतानाही तुम्हाला लाइक (Like) , नापसंत (Unlike), टिप्पणी (Comment), प्लेलिस्टमध्ये ॲड (Add to playlist) आणि शेअर (Share) असे ऑप्शन दिले जाणार आहे. यापैकी कोणत्याही ऑप्शनवर क्लिक करण्यासाठी तुम्ही फुल स्क्रीन व्ह्यू बंद करण्याची गरज नसणार आहे.

व्हिडीओ शेअर करणं झालं अगदी सोपं!

Advertisement

जर तुम्ही यूट्यूब वापरत असाल तर तुम्हाला व्हिडीओ कसा शेअर करता येईल हे माहित असणे आवश्यक आहे. लक्षात घ्या, तुम्ही जर एखादा व्हिडीओ बघत असाल आणि त्याचवेळी तो आपल्या एखाद्या मित्रासोबत शेअर करू वाटला तर यापूर्वी असं करण्यासाठी तुम्हाला फुल स्क्रीन व्ह्यू बंद करावा लागायचा. पण फोन पुन्हा पोर्ट्रेट मोडमध्ये ठेवावा लागतो आणि मग त्यानंतर तुम्ही ॲक्सेस करून व्हिडीओ शेअर करत होता, हे माहीतच आहे. आता यूट्यूब हा पर्याय तुम्हाला स्क्रीनच्या अगदी तळाशी फुल स्क्रीन व्ह्यूमध्ये देत आहे. व्हिडीओ शेअरिंग यामुळे अगदी सोपं होणार आहे. फक्त तुम्हाला लगेच गूगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) जाऊन ‘Manage Apps & Device मध्ये जाऊन Youtube ॲपसमोरील Update (अपडेट) नावावर क्लिक करा आणि आता अपडेट होऊ द्या किंवा ॲप स्टोअर (App Store) वर जाऊन तुमचे यूट्यूब ॲप अपडेट करा.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement