SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विराट व कुंबळे यांच्यातील वादाचे नेमकं कारण समोर, पुस्तकांत धक्कादायक खुलासे..

भारतीय क्रिकेट नि वादाचे नाते तसे जूनेच.. चाहत्यांनाही आता अशा वादाची सवय झालीय.. भारतीय क्रिकेटमध्ये नेहमीच खेळांडूमध्ये, कोच व कॅप्टनमध्ये रुसवे-फुगवे राहिले आहेत. त्यातून काहींना संघाबाहेर व्हावे लागले, तर काहींची क्रिकेट कारकिर्दच संपली..!

भारतीय क्रिकेटमध्ये असाच एक रंगलेला वाद म्हणजे, माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे नि माजी कर्णधार विराट कोहली यांच्यातील भांडण.. माध्यमांमधून हा वाद चांगलाच रंगवला गेला. मात्र, त्यांच्यातील वादाचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नव्हते. मात्र, आता यासंबंधीचे काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत..

Advertisement

भारतीय संघाचे माजी मॅनेजर रत्नाकर शेट्टी यांनी त्यांच्या ‘ऑन बाेर्ड’ (On Board : Test, Trial, Triumph) पुस्तकात विराट व कुंबळे यांच्यातील वादावर अनेक मोठे खुलासे केले आहेत. विराटला अनिल कुंबळेचा नक्की कशामुळे राग यायचा, याबाबत शेट्टी यांनी सविस्तर लिहिले आहे.

2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तान संघाकडून पराभव झाला. या पराभवानंतर अनिल कुंबळे यांनी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. मात्र, त्याआधीपासूनच विराट व कुंबळे यांच्यात खटके उडण्यास सुरुवात झाली होती..

Advertisement

2016 मध्ये ऑस्ट्रेलिया संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. त्यांच्यातील कसोटी मालिकेचा शेवटचा सामना धर्मशाला येथे होणार होता. मात्र, दुखापतीमुळे विराट संघाबाहेर होता, तर रहाणे याच्यावर कर्णधार पदाची जबाबदारी दिली होती. मात्र, संघ निवडीत कोहलीने सहभाग घेतला. त्यात कुलदीप यादवला संघात घेण्यावरुन कुंबळे व विराटमध्ये वाद झाला.

कुलदीपने आधीच्या सामन्यात चांगले प्रदर्शन केले होते, पण त्याला संघात घेण्यावरुन विराट व कुंबळे यांच्यात वाद झाला नि तिथून त्यांच्या नात्यात खटका उडाल्याचे सांगण्यात येते..

Advertisement

विराटला कुंबळेंचा राग यायचा..!
शेट्टी यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे, की “विराट कोहलीला असं वाटायचं, की संघातील सहकाऱ्यांना कुंबळे हे सपोर्ट करीत नाहीत. त्यांच्या वर्तणुकीमुळे ड्रेसिंग रूममधील वातावरण तणावपूर्ण राहत होतं. त्यामुळे विराटला कुंबळेंचा खूप राग यायचा..”

“अनिल कुंबळे यांना प्रशिक्षक म्हणून बरेच खेळाडू नापसंत करीत. कुंबळेंना प्रशिक्षक पदावरून हटवलं जावं, असं अनेकांना वाटत होतं. वीरेंद्र सेहवाग व सचिन तेंडुलकर हे 2017च्या ‘आयपीएल’दरम्यान कुंबळेला भेटले होते. त्यावेळी सेहवागने कुंबळेला सांगितलं, की डॉ. श्रीधर यांनी कोच पदासाठी सेहवागला अर्ज द्यायला सांगितला आहे.”

Advertisement

“नंतर हैदराबादमध्ये अनिल कुंबळे, विराट कोहली यांची ‘सीओए’सोबत मिटिंग झाली. त्यावेळी विनोद राय यांनी पुन्हा प्रशिक्षक निवडण्याची प्रक्रिया करावी लागणार असल्याचं सांगितलं. हे ऐकून साऱ्यांनाच धक्का बसला. आम्हाला समजलं की अनेकांना अनिल कुंबळे कोचपदी नको आहे..” असे या पुस्तकात म्हटलं आहे.

दरम्यान, 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कुंबळेने आपल्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला.. केवळ 1 वर्षभर ते टीम इंडियाचे प्रशिक्षक होते. त्यानंतर पुन्हा एकदा रवि शास्री यांची प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती..

Advertisement

🎯 अशाच ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती, मनोरंजन WhatsApp वर Free मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

Advertisement