SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विद्यार्थ्यांनो, 10 वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेत होणार मदत, सरकारकडून ‘या’ वेबसाईटवर महत्वाचे प्रश्न उपलब्ध!

राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा मागील दोन वर्षामध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे प्रत्यक्ष लिहिण्याचा सराव कमी झाला आहे. तसेच, विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी व्हावा यासाठी यंदाच्या वर्षी परीक्षेसाठी अभ्यासक्रम कमी करण्याबरोबरच परीक्षेची वेळ वाढवून देण्याचा निर्णयही मंडळामार्फत घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंच कुठे उपलब्ध?

Advertisement

विद्यार्थ्यांचा बोर्डाच्या परीक्षेत (SSC-HSC Board Exams) पेपर लिहिण्यासाठी सराव व्हावा, यासाठी राज्य मंडळाच्या इ. 10वी आणि इ. 12वी च्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण विषयानुसार प्रश्नसंच (subjectwise question banks for class Xth & XIIth) तयार करण्यात आला आहे, अशी माहीती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.

कोरोना पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांमध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव काही प्रमाणात कमी झाल्याने राज्य सरकारकडून आता प्रश्नपेढी विकसित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रिकाम्या जागा भरा, लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न यांद्वारे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, हे विद्यार्थ्यांना समजावं. त्यासोबतच प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव व्हावा आणि परीक्षेत पेपर लिहिताना वेळेचा अंदाज वाढून आत्मविश्वास वाढावा म्हणजे पेपर वेळेत लिहून पूर्ण होण्याची चिंता होणार नाही. यादृष्टीने हा प्रश्नसंच तयार करण्यात आला आहे.

Advertisement

10वी च्या विद्यार्थ्यांनी प्रश्नसंच पाहण्यासाठी क्लिक करा (SSC Board Exams Question Banks) 👉
https://www.maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi_10

12वी च्या विद्यार्थ्यांनी प्रश्नसंच पाहण्यासाठी क्लिक करा (HSC Board Exams Question Banks) 👉 https://www.maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi_12

Advertisement

राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी प्रत्येक विषयाचा सराव, स्वयंअध्ययनासाठी या प्रश्नसंचाची अधिक मदत होणार आहे आणि बोर्डाच्या परीक्षेला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास उंचावेल, यामुळे हे प्रश्‍नसंच तयार केले जात आहेत. हे प्रश्नसंच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement