‘शार्क टॅंक इंडिया’ शो मधील शार्क्स एका भागासाठी किती मानधन घेतात, त्यांची संपत्ती किती आहे माहितेय का?
भारतात केबीसी, बिगबॉस नंतर सर्वात जास्त प्रसिद्धी मिळवणारा शो म्हणजे शार्क टॅंक इंडिया Shark Tank India होय. या शो ची सध्या सगळीकडे जबरदस्त चर्चा होतेय. यात शो मध्ये येणाऱ्या entrepreneurs तरूणांच्या स्टार्ट-अपच्या आयडिया समजून घेऊन त्यांचा बिझनेस मोठा करण्यासाठी काही भागीदारी घेऊन स्वतः ठराविक टक्के गुंतवणूक करतात. यात जे जज आहेत त्यांना शार्क असं संबोधलं जातं.
जाणून घेऊया शार्क्स च्या मानधन आणि संपत्तीबद्दल..
1) अशनीर ग्रोव्हर: सर्वात फटकळ मतप्रदर्शन करणारे शार्क म्हणून अशनीर ग्रोव्हर यांचं नाव घेतलं जातं. ते BharatPe चे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि सह-संस्थापक (Co-Founder) अश्नीर ग्रोव्हर हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्ली मधून पदवीधर आहेत. तसेच IIM अहमदाबादचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांची तब्बल 700 कोटी रुपये संपत्ती आहे. एका कार्यक्रमाचं मानधन म्हणून अशनीर हे 10 लाख रुपये घेतात.
AdvertisementView this post on Instagram
Advertisement
2) नमिता थापर : पुण्यात जन्मलेल्या नमिता थापर, एमक्योर फार्मास्युटिकल्सच्या (Emcure Pharmaceuticals) या औषध विक्री क्षेत्रातील कंपनीच्या कार्यकारी संचालक असून त्यांचे शिक्षण पुणे येथे झाले. मग त्यांनी ICAI मधून चार्टर्ड अकाउंटंटची पदवी घेतली. त्यानंतर नमिता यांनी MBA केले आणि ड्यूक युनिव्हर्सिटीच्या फुका स्कूल ऑफ बिझनेसमधून पदवी मिळवली. नमिता यांची एकूण संपत्ती 600 कोटींच्या जवळपास आहे. एका कार्यक्रमाचं मानधन म्हणून नमिता 8 लाख रुपये घेते.
3) अमन गुप्ता : BoAt चे सह-संस्थापक आणि CMO अमन गुप्ता, ज्यांनी दिल्ली पब्लिक स्कूल आणि नंतर सीए करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) मध्ये शिक्षण घेतले. इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधून त्यांनी फायनान्स आणि स्ट्रॅटेजीमध्ये एमबीए केले आहे. त्यांचे दुसरे MBA लॉग ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मॅनेजमेंट यूएसएमधून आहे. त्यांनी येथे व्यवस्थापन आणि मार्केटिंगमध्ये MBA केले आहे. अमन यांची एकूण संपत्ती 700 कोटी रुपये इतकी आहे.
4) विनिता सिंग : शुगर कॉस्मेटिक्सच्या (Sugar Cosmetics) संस्थापक आणि सीईओ विनिता सिंग यांनी आयआयटी मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि आयआयएम अहमदाबादमधून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. फार विचारपूर्वक पद्धतीने गुंतवणूक करणाऱ्या विनिता या शुगर कॉसमॅटिक कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक आहेत. विनिता यांची एकूण संपत्ती 59 कोटी इतकी आहे. एका कार्यक्रमाचं मानधन म्हणून विनिता 5 लाख रुपये घेते.
5) गझल अलग मम्माअर्थ (MamaEarth) या कॉस्मेटिक ब्रँडचे सह-संस्थापक आहेत. यांनी पंजाब विद्यापीठातून बीसीए (बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) केले आहे. गझल यांची एकूण संपत्ती 148 कोटी इतकी आहे. ममाअर्थ कंपनीच्या संस्थापक असणाऱ्या गझल या प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि कम्युनिटी मॅनेजमेंट क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. एका कार्यक्रमाचं मानधन म्हणून गझल 8 लाख रुपये घेते.
6) अनुपम मित्तल पीपल ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ अनुपम मित्तल हे बोस्टन विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीधर आहेत. त्यांनी ऑपरेशन्स आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये एमबीएची पदवी देखील घेतली आहे. शादी डॉट कॉम, मकान डॉट कॉम सारख्या साईट्स या त्यांच्याच आहेत. मागील काही दिवसांत ओलामध्येही त्यांनी एक कोटींची गुंतवणूक करून मालकीच्या दोन टक्के इतकी हिस्सेदारी घेतली आहे. अनुपम यांची एकूण संपत्ती 185 कोटी इतकी आहे. एका कार्यक्रमाचं मानधन म्हणून अनुपम 7 लाख रुपये घेतात.
7) पियुष बन्सल: लेन्सकार्टचे (LensKart) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक पीयूष बन्सल यांनी मॅक्गिल युनिव्हर्सिटी, मॉन्ट्रियल, कॅनडातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. त्याच्याकडे आयआयएम पदव्युत्तर पदवी देखील आहे. पियूष हे देशातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक असून त्यांची संपत्ती 600 कोटी आहे. एका कार्यक्रमाचं मानधन म्हणून पियुष 7 लाख रुपये घेतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हेही वाचा : आजचे राशिभविष्य; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस
फक्त 150 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार 20 लाख रुपये; ‘पोस्टा’ची खास बचत योजना; घ्या जाणून
यूट्यूब आणणार धडाकेबाज फिचर्स! ‘या ‘ गोष्टी तुम्ही व्हिडीओ पाहातानाही करू शकणार
10 वी / 12वी साठी प्रश्नपेढी सरकारकडून जारी; सरकार तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी करणार मदत!