SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पहिल्या सामन्याआधीच टीम इंडियात धक्कादायक बदल, अचानक ‘या’ खेळाडूंना केले पाचारण..

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन-डे सीरिजला आजपासून (रविवार) सुरूवात होणार आहे. मात्र, मालिकेला सुरुवात होण्याआधीच टीम इंडियात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश असल्याने भारतीय संघासमोर प्लेईंग-11 तयार करण्याचे आव्हान निर्माण झाले होते.

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन, ऋतुराज गायकवाड यांच्यासह मधल्या फळीतील श्रेयस अय्यर यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यात के.एल. राहुल याने वैयक्तिक कारणामुळे पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मासोबत सलामीला कोण उतरणार, असा प्रश्न निर्माण झाला होता.

Advertisement

किशन उतरणार सलामीला..
भारतीय संघातील दिग्गज खेळाडू सामन्यातून बाहेर झाल्याने अखेरच्या क्षणी संघात अनेक अनपेक्षित बदल करण्याची वेळ टीम इंडियासमोर आली. त्यामुळे इशान किशन व शाहरुख खान यांचा समावेश भारतीय संघात करण्यात आला आहे. धवन, ऋतुराज व राहुल यांच्या गैरहजेरीत इशान किशन ओपनिंगला खेळणार असल्याचे रोहित शर्माने जाहीर केलं आहे.

सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी, तसेच विजय हजारे ट्रॉफीमध्ये शाहरुख खानने धमाकेदार कामगिरी केली होती. त्याचे फळ त्याला मिळाले. थेट टीम इंडियात शाहरुखची एण्ट्री झाली असून, वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वन-डेमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

Advertisement

टीम इंडियाचे तिन्ही ओपनर उपलब्ध नसल्यामुळे मयांक अग्रवाल यालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, त्याचा क्वारंटाईन कालावधी संपत नसल्यामुळे, निवडीसाठी तो उपलब्ध नाही. इशान किशनने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून दमदार कामगिरी केली आहे.. त्याच्या जोरावरच त्याची टीम इंडियात निवड झाली.

भारतीय टीम
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, ईशान किशन, शाहरुख खान.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी क्लिक करा

Advertisement