SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फक्त 150 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार 20 लाख रुपये, ‘पोस्टा’च्या खास योजनेबाबत जाणून घ्या..!

वृद्धापकाळात गाठीशी थोडा-फार पैसा असणे गरजेचं असतं.. आजारपण, दैनंदिन खर्चासाठी हाच पैसा कामी येतो. त्यासाठी आधीपासूनच गुंतवणूक करणे महत्वाचे असते.. त्यानुसार, प्रत्येक जण आपआपल्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करीत असतो. चांगला परतावा मिळवण्यासाठी काही जण जोखीम घेतात, तर काही जण सुरक्षित गुंतवणूकीला प्राधान्य देतात..

सुरक्षित गुंतवणूक नि चांगल्या परताव्यासाठी सध्याच्या काळात ‘पोस्ट ऑफिस’ उत्तम पर्याय आहे. ‘पोस्ट ऑफिस’ने अनेक छोट्या छोट्या बचत योजना सुरु केल्या आहेत. पोस्ट ऑफिसच्‍या अशाच एक योजनेतून कमी धोका व चांगला रिटर्न्स मिळतो. ‘पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड’ (Post Office PPF scheme) असे या योजनेचे नाव आहे..

Advertisement

पोस्ट ऑफिसची ही एक खूप लोकप्रिय योजना आहे. विशेषतः मध्यमवर्गीयांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना खूप लोकप्रिय आहे. या योजनेत अगदी माफक गुंतवणुकीवरही दीर्घ मुदतीत लाखो रुपयांचा परतावा मिळतो. या योजनेबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

‘पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड’ योजनेबाबत..
‘पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड’ योजनेत दररोज फक्त 150 रुपये गुंतवता येतात. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा आहे. मात्र, तुम्हाला तो 5-5 वर्षांसाठी दोन वेळा वाढविता येतो. सोबतच योजनेसह करातही सूट मिळते. योजनेत वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळते. शिवाय दरवर्षी चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो.

Advertisement

असे मिळणार 20 लाख रुपये..
तुम्ही वयाच्या 25 वर्षी दररोज 100-150 रुपये बचत करण्यास सुरुवात केल्यास, वयाच्या 45व्या वर्षी 20 लाख रुपयांपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. रोजच्या 150 रुपयांनुसार मासिक 4500 रुपये, तर वार्षिक गुंतवणूक 54 हजार रुपये होईल. एकूण गुंतवणूक 20 वर्षांत 10.80 लाख रुपये असेल. त्यावर वार्षिक 7.1 टक्के व्याजाने 20 वर्षांत 20 लाखांपेक्षा जास्त रक्कम तुम्हाला मिळेल..

अन्य कोणते लाभ होणार..?
‘पीपीएफ’ योजनेतून चांगला परतावा मिळतो, शिवाय अन्य लाभही मिळतात. योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर लाभ मिळतो. योजनेतील 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर वजावट घेता येते. ‘पीपीएफ’मध्ये मिळणारे व्याज नि मॅच्युरिटी रक्कमही करमुक्त आहे. या योजनेतील गुंतवणूक ‘ईईई’ श्रेणीत येते. सरकारचे या योजनांना संरक्षण असल्याने तुमची रक्कम पूर्णपणे सुरक्षित असते.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी क्लिक करा

Advertisement