SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

मेष (Aries) : मनावरील ताण दूर सारावा. कौटुंबिक प्रश्नातून मार्ग काढावा. सामाजिक जाणि‍वेतून काम कराल. आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल. व्यवसायात तुम्ही नवीन करार करू शकता, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो

वृषभ (Taurus) : दुराग्रहीपणे निर्णय घेऊ नका. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. घरगुती कामात रमून जाल. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.

मिथुन (Gemini) : कामात उगाचच खो बसल्यासारखा वाटू शकतो. प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष नको. थोडी चिडचिड कमी करावी. जुन्या गोष्टी मनाला दुखवू शकतात.

Advertisementकर्क (Cancer) मुलांचे वागणे त्रासदायक वाटू शकते. शिस्तीचा फार बडगा करून चालणार नाही. मित्रांकडून कौतुक केले जाईल. प्रवास सावधानतेने करावा. उत्पन्न वाढेल. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात

सिंह (Leo) : किरकोळ कौटुंबिक कटकटी राहतील. अनावश्यक खर्चावर ताबा ठेवावा. मनात नसत्या शंका आणू नका. विद्यार्थ्यांना अभ्यासात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात.

कन्या (Virgo) : मनोरंजनातून आनंद घ्याल. मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. सढळ हाताने मदत कराल. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.

Advertisementतूळ (Libra) : मनातील इच्छा पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. अपुरी कामे पूर्णत्वास जातील. जवळचे मित्र भेटतील.

वृश्चिक (Scorpio) : गप्पा मारण्यात वेळ वाया घालवून चालणार नाही. लोकांचा तुमच्याबाबत गैरसमज होऊ शकतो. जोडीदाराच्या सौख्याला बहर येईल.

धनु (Sagittarius) : कौटुंबिक रूसवे-फुगवे दूर करावे लागतील. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. परिस्थितीनुसार कामात काही बदल करावे लागतील.मकर (Capricorn) : उगाच कसली तरी कमतरता जाणवेल. मनातील चुकीच्या विचारांना आवर घालावा लागेल. कौटुंबिक सौख्य वृद्धिंगत होईल.

कुंभ (Aquarius) : अपचनाचा त्रास जाणवेल. क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. स्वभावात काहीसा चिडचिडेपणा येईल. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे.

मीन (Pisces) : मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. कौटुंबिक गोष्टीत संयम बाळगावा. शेअर्सच्या व्यवहारातून लाभ संभवतो. कामात नवीन पर्यायांचा अवलंब करावा.

Advertisement