SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

धक्कादायक! पुण्यातील घटना, 5 कामगारांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?

पुण्यामधील येरवड्यात शास्त्रीनगर भागात वाडिया बंगल्याजवळ एका इमारतीचं स्लॅब भरण्याचं काम चालू असताना अचानक स्लॅब कोसळून कामगार अडकले. त्यामध्ये पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पाच जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री (3 फेब्रुवारी) घडली आहे.

घटनेविषयी जाणून घ्या सविस्तर:

Advertisement

प्राप्त माहितीनुसार, शास्त्रीनगर चौक वाडीया बंगला गेट नंबर 8 येथील नवीन इमारतीचा स्लॅब भरण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असताना ही घटना घडल्याचं समोर आलं. याच दरम्यान बेसमेंट पार्किंगवर स्लॅबमध्ये टाकण्यासाठी लोखंडी सळ्यापासून बनलेली जाळी ठेवली होती. मात्र अचानक ही जाळी काम करणाऱ्या 10 कामगारांवर कोसळली आणि ही घटना घडली.

स्लॅबसाठी लोखंडाच्या सळ्यांची तयार केलेली जाळी (Construction Building slab collapse in pune) कोसळून त्याखाली 10 कामगार अडकले. त्यामध्ये पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन तासांच्या प्रयत्नानंतर जाळीच्या खाली दबलेल्या उर्वरित 5 मजुरांना जाळी कटरने कापून बाहेर काढण्यात आलं.

Advertisement

पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून देवदूत पथकासह युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असल्याचं पुण्याचे महापौर मुलीधर मोहोळ यांनी रात्री साडेबाराच्या सुमारास ट्विटरवरुन सांगितलं. अग्मिशमन दलाने घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी धाव घेतली. हे कामगार कुठले आहेत आणि या कामात किती कामगार होते, याबाबत अधिकृत माहीती नाही. आता गंभीर जखमी झालेल्या कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Advertisement

मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आले आहेत. तर जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. याआधीदेखील पुण्यात वाघोली, आंबेगाव, बाणेर, सिंहगड रोड येथे अशा घटना घडल्या आहेत, त्यात कामगारांचा मृत्यू झाला आहे. आता पुण्यातील या इमारतीचा स्लॅब नेमका कशामुळे कोसळला व कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली खबरदारी या ठिकाणी घेण्यात आली होती का नाही? असे सर्व प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement