SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ओप्पो’चे दोन धमाकेदार स्मार्टफोन भारतात लाॅंच, फिचर्स पाहून तोंडात बोटे घालाल..!

मोबाईल युजर्ससाठी एक महत्वाची बातमी आहे.. ‘ओप्पो’.. मोबाईल उत्पादक कंपन्यांमधील आघाडीचे नाव.. चीनमधील या कंपनीने अनेक दर्जेदार स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. विशेष म्हणजे, ‘ओप्पो’च्या (Oppo) स्मार्टफोन्सला भारतातही मोठ्या प्रमाणात ग्राहकांची पसंती मिळत आहे..

‘ओप्पो’ कंपनीने भारतीय बाजारपेठेत दोन जबरदस्त फोन लाॅंच केले.. ‘ओप्पो रेनो-7’ (Oppo Reno 7) व ‘ओप्पो रेनो 7 प्रो’ (Oppo Reno 7 Pro), अशी त्यांची नावे आहेत.. ‘ओप्पो रेनो’ (Oppo Reno) सीरिजमधील या दोन स्मार्टफोनबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती.. ‘ओप्पो’चे हे दोन्ही स्मार्टफोन 5G मध्ये उपलब्ध असतील.

Advertisement

‘ओप्पो रेनो 7 प्रो’ स्मार्टफोनमध्ये ‘सोनी आयएमएक्स 709 सेंन्सर’ (Sony IMX 709 Ultra Sensing) मिळेल. मोबाइलमध्ये असे सेन्सर वापरणारा हा जगातील पहिला मोबाईल असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे मोबाईलवर मेसेज आल्यानंतर त्यातील लाइट युजर्सला अलर्ट करील.

Advertisement

दरम्यान, या दोन्ही फोनसह ओप्पो कंपनीने ‘Oppo Enco M32 Bluetooth Headset’ देखील भारतात लाँच केला आहे. त्याची किंमत 1799 रुपये असल्याचे सांगण्यात आले..

ओप्पो रेनो 7 हा स्मार्टफोन 17 फेब्रुवारीपासून, तर ओप्पो रेनो 7 प्रो हा स्मार्टफोन 8 फेब्रुवारीपासून भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहेत. या दोन्ही स्मार्टफोनबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

ओप्पो रेनो -7 (Oppo Reno 7)
स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम असून, 5GB व्हर्च्युअल रॅम दिली जाऊ शकते. तसेच, 256GB स्टोअरेज असेल. MediaTek Dimensity 900 SoC दिले जाऊ शकते.
– त्यात 8 मेगा पिक्सेल अल्ट्रा-वाइड शूटर आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो शूटरसह 64 मेगापिक्सेल ओम्निव्हिजन OV64B प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो.
– फ्रंन्टमध्ये 32 मेगापिक्सलचा Sony IMX615 सेल्फी कॅमेरा असेल. त्यात 65W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह 4500mAh बॅटरी असेल..
– स्मार्टफोनमध्ये USB Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक असेल. त्यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असेल.
– किंमत – 29990/- रुपये

 ओप्पो रेनो 7 प्रो (Oppo Reno 7 Pro)
– स्मार्टफोनला बॅक पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. त्यामध्ये 32 मेगापिक्सल Sony IMX709 अल्ट्रा सेंन्सिंग कॅमेरा आहे. त्यात फ्लॅगशिप सोनी आयएमएक्स 766 सेंन्सर (Sony IMX766 Sensor) असणारा 50 मेगापिक्सल कॅमेरा असेल. हा कॅमेरा सेंन्सर दुसऱ्या मोबाइल कॅमेराच्या तुलनेत प्रकाशासाठी 60 टक्के जास्त सेंसेटिव्ह आहे.

Advertisement

– मोबाईलला 6.55 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला असून, 1080×2400 पिक्सल रिजल्युशेन आहे. मीडियाटेक डायमेंन्सिटी 1200 मॅक्स प्रोसेसर दिला आहे.
– त्यात 12GB रॅम, तर 256GB स्टोअरेज असून, 4500mAh डुअल सेल बॅटरी दिली आहे, जी 65W फास्ट चार्जिंगसह येईल.
– हा स्मार्टफोन विना वायर कंप्यूटरला अटॅच होऊ शकतो. त्याचा डेटा ट्रान्सफर स्पीड 45mb प्रति सेकंद आहे.

– संभाव्य किंमत – 39,990/- रुपये 

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Advertisement