SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ड्रायव्हिंग लायसन्स’वरील पत्ता घरबसल्या बदलता येणार.. ‘ऑनलाईन प्रोसेस’ जाणून घ्या…!

ड्रायव्हिंग लायसन्स.. अर्थात वाहन चालविण्याचा अधिकृत परवाना.. हे असे सरकारी कागदपत्र आहे, की जे तुम्हाला देशात कुठेही वाहन चालवण्याची परवानगी देते. शिवाय ओळखपत्र म्हणूनही त्याचा वापर होतो. साधारण 20 वर्षे वा त्याहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांना ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ दिले जाते. ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ विना वाहन चालविल्यास दंड भरावा लागतो.

‘ड्रायव्हिंग लायसन्स'(Driving License) ‘अपडेट’ असणं गरजेचं आहे.. बऱ्याचदा तुमचा पत्ता, मोबाईल नंबर बदलला जातो. अशा वेळी आधार कार्डसह सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांवर तसा बदल करायला हवा.. महत्वाची ‘डॉक्युमेंट्स’ अपडेट करायला हवीत. जेणेकरुन कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही..

Advertisement

‘ड्रायव्हिंग लायसन्स’वरील पत्ता अपडेट करण्यासाठी ‘आरटीओ’ (RTO) ऑफिसच्या चकरा मारायचीही गरज नाही किंवा आपले काम करुन घेण्यासाठी एजंटचे हातही ओले करावे लागणार नाहीत. कारण, अगदी घरबसल्या तुम्ही हे काम करु शकता.. ऑनलाइन पद्धतीने अगदी सहज ‘ड्रायव्हिंग लायसन्स’वरील पत्ता बदलता येतो.

असा बदला ऑनलाइन पत्ता..
सर्वात आधी parivahan.gov.in वेबसाईटवर जा.
– ऑनलाईन सर्व्हिसमध्ये ‘ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्व्हिस’ (Driving License Related Services)वर क्लिक करा.
– ड्रॉप डाउन लिस्टमध्ये तुमचे राज्य निवडा.

Advertisement

– लायसन्स रिलेटेड सर्व्हिसमध्ये ड्रायव्हर्स/लर्नर्स लायसन्स (Drivers/ Learners License)वर क्लिक करा.
– नंतर ‘अप्लाय फाॅर चेंज ऑफ अॅड्रेस’ (Apply for Change of Address)वर टॅप करा.
– अर्ज जमा करण्यासाठी एक स्क्रिन ओपन होईल.
– स्क्रिनवरील डिटेल्स वाचून ‘Continue’वर क्लिक करा.

– इथे तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर (Driving License Number) व जन्मतारीख टाका.
– आता ‘गेट डीएल डिटेल्स’ (Get DL Details)वर क्लिक करा.
– सबमिट केलेले डिटेल्स तुमचे असल्याचं नमूद करण्यासाठी ड्रॉप डाउनमध्ये Yes वर क्लिक करा.

Advertisement

– लिस्टमध्ये जवळच्या RTO ची निवड करा आणि Proceed वर क्लिक करा.
– नव्या Address सह इथे आवश्यक सर्व डिटेल्स भरा.
– Change of address on DL समोर असलेल्या बॉक्सवर चेक करा. इथे Permanent, Present, किंवा Both पैकी एक ऑप्शन निवडा आणि डिटेल्स भरा. आता Confirm-Submit वर क्लिक करा.

हेही वाचा..
फॉर्म 33 अ‍ॅप्लिकेशन, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, नवा अ‍ॅड्रेस प्रुफसाठी पासबूक, वोटर आयडी, आधार कार्ड किंवा वीजबिल द्यावं लागू शकतं. इन्शुरन्स सर्टिफिकेट, पॉल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट, पॅन कार्ड किंवा फॉर्म 60 आणि फॉर्म 61 अटेस्टेड कॉपी द्यावी लागेल.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करण्यासाठी क्लिक करा

Advertisement