SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यास सुरुवात, यादीत तुमचं नाव आहे का? तपासा..

जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) अतिशय महत्त्वाची आहे. पोकरा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी अर्ज केले होते, त्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

जाणून सविस्तर तपशील..

Advertisement

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत सन 2021-22 या वर्षासाठी विविध बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी तब्बल 600 कोटी रुपयांचा निधी वितरण करण्यास मागील आठवड्यात शासनामार्फत मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली होती.

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यातील 15 जिल्ह्यातील 5142 खेड्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana Registration) राबवली जाते. दरम्यान प्रलंबित असलेले अनुदान लाभार्थ्यांना मिळण्यास आता सुरुवात झाली आहे. खालील वेबसाईटवर जा व अधिक माहिती घ्या.

Advertisement

तुम्हीही अर्ज केला असेल, तर यादीत तुमचं नाव तपासा 👉 https://mahapocra.gov.in/

या निधीचे हे प्रत्यक्ष लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास 2 फेब्रुवारी 2022 म्हणजे बुधवार पासून सुरुवात झालेली आहे. या लाभार्थ्यांच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर ही अनुदानाची वितरण करण्यात येणार आहे अश्या लाभार्थ्यांच्या नावांची यादी देखील पोखरा च्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे

Advertisement

या प्रकल्पांतर्गत वैयक्तिक लाभाच्या बाबी जसे की शेततळे, ठिबक संच, फळबाग लागवड तसेच इलेक्ट्रिक मोटर इत्यादी तसेच शेतकरी गटांना लाभ ( शेतीसाठी सोयीसुविधा व कृषी प्रक्रिया उद्योग) तसेच पाण्याचा ताळेबंद यावर आधारित मृद व जलसंधारणाची कामे अशा विविध बाबींचा समावेश आहे.

या योजनेंतर्गत शेतकर्‍यांच्या दुष्काळग्रस्त भागाला राज्य सरकार दुष्काळमुक्त करेल जेणेकरून शेतकरी शेती करू शकतील आणि शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न मिळू शकेल आणि ते स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवू शकतील, असं उद्दिष्ट आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement