देशातील परिवहन आणि पर्यटन संसदेच्या समिती अध्यक्षांनी बुधवारी संसदेमध्ये एक अहवाल सादर केला. त्यानुसार, टोलनाक्यावरील रांगा आणि गर्दी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘फास्टॅग’ (Fastag) ही प्रणाली सुरु केली होती. पण आता ‘फास्टॅग’ प्रणाली हटवून ‘जीपीएस'(GPS) प्रणाली तंत्राचा वापर करण्याची या अहवालात शिफारस केली आहे.
‘जीपीएस’ प्रणाली लवकरच सुरु होणार
देशामध्ये फास्टॅगचा ऑनलाईन रिचार्ज करण्याची प्रक्रिया माहीत नसलेल्या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे भविष्यात ‘जीपीएस प्रणाली’ उपयोगी ठरेल, असं संसदीय समितीला वाटतं. या शिफारशीची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन सरकारनं समितीला दिलं आहे.
AdvertisementView this post on Instagram
Advertisement
परिवहन आणि पर्यटनाशी संबंधित स्थायी समिती अध्यक्ष टी. जी. व्यंकटेश यांनी बुधवारी संसदेत राष्ट्र निर्माणातील राष्ट्रीय महामार्गांची भूमिका याबद्दलचा अहवाल सादर केला. त्या अहवालानुसार, मात्र आता टोलचे पैसे देताना फास्टॅगऐवजी आता जीपीएस यंत्रणेच्या साहाय्याने टोलचे (Toll Plaza) पैसे बँक खात्यातून वजा करणारी यंत्रणा सरकार उभी करणार आहे. ‘जीपीएस’ प्रणाली अंतर्गत टोल शुल्क वसूल करण्याची यंत्रणा सुरू करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आली आहे, असंही सरकारने म्हटले आहे.
देशात येत्या काही दिवसांमध्ये वाहनधारकांच्या टोलचे पैसे जीपीएसच्या माध्यमातून थेट बँक खात्यामधून वजा होण्याची शक्यता असून याचा लोकांना चांगला फायदा होणार आहे. ऑनलाईन रिचार्ज करताना काही जणांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र GPS System कार्यान्वित झाल्यानंतर या कटकटीतून कायमची प्रवासी-वाहनधारकांची सुटका होईल, हे निश्चित आहे. याशिवाय टोल नाका उभा करण्याचा खर्चही कमी होईल.
टोलनाक्यावरील ‘फास्टॅग’मुळे राष्ट्रीय महामार्गाला (National Highway) पर्याय शहरी व ग्रामीण भागातून जाणाऱ्या रस्त्यावरील अवजड मोठ्या वाहनांची वर्दळ घटली आहे. पण आता टोल वसुलीसाठी जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर झाला तर टोलनाक्यावर वाहनांच्या होणाऱ्या रांगा आणि वाहतूक कोंडीपासून प्रवाशांची सुटका होणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी नाही होणार आणि इंधनाची बचत तर हमखास होणारच आहे. तसेच, प्रवासासाठी लागणारा वेळही यामुळे वाचणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit