SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुमच्या जमिनीलाही मिळणार आधारसारखा नंबर, एका क्लिकवर मिळणार जमिनीची माहीती..

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाचं बजेट मांडताना नवी घोषणा केली आहे. त्यानुसार जमिनींच्या डिजिटल नोंदी 2023 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं आखलं आहे. या डिजिटल नोंदीमुळं कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन फक्त एका क्लिकवर तुमच्या जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि माहिती तुम्हाला मिळू शकेल.

डिजिटल लँड रेकॉर्डविषयी ठळक मुद्दे:

Advertisement

1) तुमच्या जमिनीसाठी 14-अंकी ULPIN क्रमांक म्हणजेच युनिक नंबर (Unique registered number for lands) जारी केला जाणार आहे.

2) सोप्या भाषेत जमिनीचा आधार (Aadhaar) क्रमांकही आपण याला म्हणू शकतो. ULPIN क्रमांकाद्वारे जमीन खरेदी-विक्रीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.

Advertisement

3) जमिनीचे डिजिटल रेकॉर्ड आयपी आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने केले जाईल.

4) हे 3C सूत्रानुसार वितरित सेंट्रल ऑफ रेकॉर्ड्स, कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स, कन्व्हिनियन्स ऑफ रेकॉर्ड्सचा सामान्य जनतेला खूप फायदा होणार आहे.

Advertisement

5) डिजीटल रेकॉर्ड असल्‍याने (Digital record) सर्वसामान्याना त्यांच्या शहरातील कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन त्याच्या जमिनीची संपूर्ण माहिती मिळेल.

6) भारतात 140 दशलक्ष हेक्टर जमिनीवर(land) शेती होत आहे. 125 दशलक्ष हेक्टर जमिनीचे (land) दुरुस्ती करणं सुरु आहे.

Advertisement

7) ULPIN क्रमांकामुळे तुम्हाला भारतात कुठेही जमीन खरेदी-विक्री (land Buying and selling) करताना कसल्या हि प्रकारची अडचण येणार नाही.

8) डिजिटल रेकॉर्डमुळे सर्वप्रथम जमिनीची खरी स्थिती कळणार आहे. जमिनीचे विभाजन झाल्यास नव्या तुकड्याचा क्रमांक वेगळा असणार आहे.

Advertisement

9) जमिनीचे मोजमाप (Ground Metering) हे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे होईल आणि याचे बरेच फायदे होणार आहे.

10) देशामध्ये आधार लिंकिंग नऊ राज्यांमध्ये (महाराष्ट्र, गोवा, बिहार, ओडिशा, सिक्कीम, गुजरात, त्रिपुरा, राजस्थान आणि हरियाणा) प्रथम सुरू होण्याची शक्यता आहे, जिथे ULPIN सुरू करण्यात आले आहे.

Advertisement

दरम्यान, आधार वापरल्याने बेनामी मालमत्ता (जिथे मालमत्ता खरेदीदार/विक्रेत्याचे नाव खरे नाही) रोखण्यास मदत होईल आणि त्यामुळे ‘शाई-आधारित फिंगरप्रिंट’ प्रदान करण्यासाठी आपली बोटे शाईत बुडवावी लागण्याची संभाव्य गैरसोय टाळली जाईल, असंही सरकारकडून सांगण्यात येतंय.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement