SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांना मिळणार हमखास पीक विमा, ‘या’ कंपन्या देतात पीक विम्याचा लाभ..!

बळीराजा अर्थात शेतकरी.. मात्र, या राजाचा नेहमीच बळी गेला आहे.. कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटांचे शुक्ल काष्ठ नेहमीच बळीराजामागे लागलेले असते.. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले पीक हातातोंडाशी येते न येते, तोच त्यावर अस्मानी संकट कोसळते.. संकटाची मालिका कायम राहिल्यास बळीराजा कधीच सुधारत नाही, संपन्न होत नाही..

पिकांच्या नुकसानीतून बळीराजाला सावरण्यासाठी अनेक पीकविम्या कंपन्या सुरु झाल्या. मात्र, बऱ्याचदा मोठे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पीकविमा मिळालेला नाही. पीकविम्या कंपन्या व शेतकऱ्यांमधील मतभेद कायम राहिले आहेत. त्यात भविष्यातही काही बदल होतील, असे वाटत नाही..

Advertisement

दरम्यान, पिकांच्या नुकसान भरपाईसाठी शासनातर्फेही अनेक विमा योजना राबवल्या जातात. आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना पीक विमा दिला जातो.. जेणेकरून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार नाही. पीक विमा मिळविण्यासाठी नेमकी कुठून विमा योजना घ्यावी, त्यावर किती प्रीमियम भरावा लागेल, याबाबत जाणून घेऊ या..

पीएम पीक विमा योजनेबाबत..
शेती उत्पादनाला शाश्वत पाठिंबा मिळावा, या उद्देशाने पंतप्रधान पीक विमा योजना सुरु करण्यात आली. अचानक येणाऱ्या अस्मानी संकटामुळे पीक नुकसान झाल्यास या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते.

Advertisement

पीएम पीक विमा योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी काही प्रीमियम रक्कम भरावी लागते. पिकाच्या नुकसानीनुसार त्यावर सबसिडी दिली जाते. खरीप पिकांसाठी, सर्व अन्नधान्य आणि तेलबिया पिकांसाठी जास्तीत जास्त 2 टक्के शुल्क आकारले जाते, तर रब्बी पिकांसाठी ‘एसआय’ किंवा वास्तविक दराच्या 1.5 टक्के किंवा त्याहून कमी रक्कम भरावी लागते.

तसेच खरीप व रब्बी वार्षिक व्यावसायिक/वार्षिक फलोत्पादन पिकांसाठी कमाल 5 टक्के किंवा त्यापेक्षा कमी प्रीमियम रक्कम भरावी लागते. त्या आधारे शासनाकडून अनुदान दिले जाते. ‘पीएम पीक विमा योजने’च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पीक विम्यासाठी अर्ज करता येतो..

Advertisement

दरम्यान, काही खासगी विमा कंपन्यांकडूनही पीक विमा योजना खरेदी करता येते. शिवाय या कंपन्यांकडून बऱ्यापैकी लाभही मिळत असल्याचे पाहायला मिळते. अशा काही कंपन्यांची नावे पुढीलप्रमाणे

 • कृषी विमा कंपनी
 • चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी
 • रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
 • बजाज अलियान्झ
 • फ्यूचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
 • एचडीएफसी एर्गो (HDFC ERGO) जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
 • इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
 • युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी
 • आयसीआयसीआय (ICICI) लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
 • टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
 • एसबीआय (SBI) जनरल इन्शुरन्स
 • युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी क्लिक करा

Advertisement