SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बाबो! मकरंद अनासपुरेंना मिळाले 1 कोटी रुपये? दुचाकीचे ॲव्हरेज वाढवण्यासाठी केलीय ‘ही’ गोष्ट, पाहा भन्नाट व्हिडीओ..

भारतीय टेलिव्हिजन विश्वात शार्क टँक इंडिया’ (Shark Tank India) या कार्यक्रमाने एकच खळबळ उडवून दिली आहे. तरुण आणि नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देणे हे या रिॲलिटी शोचे खरे उद्दिष्ट आहे. व्यवसायाची आगळीवेगळी कल्पना मांडणाऱ्या व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय सुरू/मोठा करण्यासाठी निधी दिला जातो.

आता ‘शार्क टँक इंडिया’ या शोमध्ये जाऊन आपली व्यवसायाची (Startup idea) कल्पना मांडत अभिनेते मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure) यांनी आपल्याला व्यवसायासाठी तब्बल 1 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट मिळवली. मकरंद अनासपुरे यांनी बनवलेल्या एका इंजिनच्या पार्टविषयी माहीती देताना ही गुंतवणूक ‘शार्क टँक इंडिया’ मधील शार्क Boat कंपनीचे सीईओ अमन गुप्ता यांच्याकडून मिळवली. अशी तगडी ऑफर अभिनेते मकरंद अनासपुरे यांना मिळाल्याने ते आश्चर्यकारक भावनेने पाहत आहेत.

Advertisement

मकरंद अनासपुरे हे स्वतः विनोदी अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. इंस्टाग्रामवरील या व्हिडिओबद्दल खरं सांगायचं झालं तर या व्हिडीओमधील दृश्ये हे ‘दे धक्का’ या चित्रपटातील आहेत. ‘दे धक्का’ आणि ‘शार्क टँक इंडिया’ मधील काही दृश्ये एकत्रित करून एका इंस्टाग्रामरने हा व्हिडीओ एडिट केला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ अतिशय मजेशीर बनला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा भन्नाट व्हिडीओ पाहा:

Advertisement

 

View this post on Instagram

 

Advertisement

A post shared by आम्ही Memekar (@aamhimemekar)


दरम्यान, सुरुवातीला मकरंद हे मंचावर येतात आणि त्यांच्या समोर असलेले परिक्षक यांच्यात संवाद होतो अस दाखवण्यात आलं आहे. संवाद सुरु असताना मकरंद त्याच्या इंजिनीविषयी माहिती सांगतात आणि परिक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे देतात. त्यानंतर एक परिक्षक मकरंद यांना 1 कोटी रुपयांची ऑफर देतात. हा शो पहिल्यांदाच आपल्या देशात सादर केला आहे. देशातील अनेक व्यक्तींनी या शोच्या माध्यमातून त्यांच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी आपल्या व्यवसायाची काही हिस्सेदारी देऊन लाखो-करोडो रुपयांची फंडिंग मिळवली आहे. या शोमध्ये अश्नीर ग्रोव्हर , अमन गुप्ता, पियुष बन्सल, नमिता थापर, विनिता सिंग, अनुपम मित्तल (Ashneer Grover, Aman Gupta, Piyush Bansal, Namita Thapar, Veenita Singh, Anupam Mittal) हे परिक्षक आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement