SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकींग! 10वी-12वीच्या परीक्षाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द कराव्या किंवा ऑनलाइन घ्याव्या अशी मागणी करत विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर शिक्षण विभागानं आपली भूमिका जाहीर केली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर यामध्ये फक्त काही बदल करण्यात आले आहेत.

नियोजित वेळापत्रकानुसार दहावी, बारावीची बोर्डाची प्रात्यक्षिक, लेखी परीक्षा ऑफलाइनच होणार आहे. राज्य मंडळ नियोजनानुसार ऑफलाइन परीक्षांवर ठाम असून 11 फेबुवारी 2022 पासून प्रात्यक्षिक परीक्षेसाठी लागणारे साहित्य जिल्हा केंद्रावरून वाटपाला सुरुवात होईल, अशी माहिती विभागीय सचिव आर. पी. पाटील यांनी दिली.

Advertisement

परीक्षेचे स्वरूप कसे असणार?

▪️ दहावी, बारावीच्या परीक्षा 75 टक्के अभ्यासक्रमावर लेखी, तर 40 टक्के अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक परीक्षा ऑफलाइनच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Advertisement

▪️ दहावीसाठी 16 लाख 25 हजार 311 आवेदन पत्र, बारावीसाठी 14 लाख 562 आवेदन पत्र आले असून परीक्षा ठरलेल्या तारखेनुसार ऑफलाईन होतील.

▪️ शाळा तिथं परीक्षा केंद्र असणार आहे. विद्यार्थी ज्या शाळेत शिकतो त्याच शाळेत परीक्षा केंद्र असेल. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान एक ते दीड तास आधी उपस्थित राहावं लागणार आहे.

Advertisement

▪️ 15 किंवा पेक्षा जास्त विद्यार्थी असेल तर त्या शाळेला उपक्रेंद मिळणार आहे. यापेक्षा कमी विद्यार्थी असतील तर जवळचं उपकेंद्र मिळेल. झिगझॅग पद्धतीनं विद्यार्थ्यांना बसावे लागणार आहे. एक वर्गात 25 विद्यार्थी बसणार आहेत.

▪️ सकाळच्या सत्रातील पेपर 10 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. प्रश्नपत्रिकेच्या वाचण्यासाठी 10 मिनिटे देण्यात येईल. वस्तूनिष्ठ, लघुत्तरी, दिर्घोत्तरी असं परीक्षेचं स्वरुप असेल.

Advertisement

▪️ लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे 40 ते 60 गुणांसाठी 15 मिनिटे अधिक वेळ, 70-100 गुणांच्या परीक्षेसाठी अर्धा तास जास्त वेळ देण्यात येणार आहे.

परीक्षा कधी होणार?

Advertisement

▪️ दहावीची लेखी ऑफलाइन परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान होणार आहे. त्याची श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन 25 फेब्रुवारी ते 14 मार्च 2022 दरम्यान होणार आहे.

▪️बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान होणार असून 14 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा होईल.

Advertisement

आंदोलनावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया:

हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनावरून मागील 2 दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने आंदोलन केले ज्या पद्धतीने चिघळले त्यावरून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजी व्यक्त झाली. राज्य शिक्षण विभागाची बाजू मांडत मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, ” ऑफलाइन परीक्षा बंद करणे योग्य होणार नाही. विद्यार्थ्यांच्या शंकांचे योग्य निरसन व त्यांचे कौन्सलिंग करता यावे यासाठी शिक्षण विभागातर्फे हेल्पलाइन सुरू केली जाणार आहे. राज्यातील ऑफलाइन परीक्षेला सगळ्या विद्यार्थ्यांचाच विरोध आहे, असं अजिबात नाहीये. आता परीक्षेला आणखी वाढीव वेळ देणे व इतर काही पावले उचलून ऑफलाइन परीक्षा अधिक सुटसुटीत करणे शक्य आहे.”, असं त्या म्हणाल्या.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement