SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘व्हाॅटस् ॲप’वर चुकून गेलेला मेसेज निवांत डिलिट करा, कंपनी ‘इतका’ वेळ वाढविणार..!

व्हाॅटस् ॲप.. इंस्टंन्ट मेसेजिंग ॲप.. आज घडीला जगात सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे ॲप..!. सोशल मीडिया क्षेत्रात ‘व्हाॅटस् ॲप’शिवाय तर आता पानही हलत नाही.. प्रत्येकाच्या माेबाईलमध्ये हे ॲप दिसतेच.. महत्वाच्या बैठका असो, की त्याचे अपडेटस् द्यायचे.. एखादी बातमी शेअर करायची असो.. वा समाजाला उपदेशाचे डोस पाजायचे असो… ‘व्हाॅटस् ॲप’चाच वापर केला जातो..!

तर असे हे सोशल मीडिया ॲप.. म्हणजेच ‘व्हाॅटस् ॲप’ आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन फिचर्स आणत असते. आताही ‘व्हॉट्स ॲप’ एका नवीन अपडेटवर काम करीत आहे.. ज्यामध्ये युजर्सला अगदी दोन दिवसांनंतरही चॅटमध्ये पाठवलेला मेसेज डिलीट करता येणार आहे.

Advertisement

एका अहवालानुसार, ‘डिलीट फॉर एव्हरी वन’ (Delete for Everyone) या फीचरची टाइमलाइन आता 2 दिवस आणि 12 तासांनी वाढवण्यावर ‘व्हाॅटस् ॲप’ (Whats app) काम करीत आहे. अर्थात, या नव्या बदलानुसार, तुम्ही एखाद्याला मेसेज पाठवला, नंतर तुम्हाला तो डिलिट करायचा असेल, तर अगदी दोन दिवसांनीही तो मेसेज डिलीट करता येणार आहे..

सध्या ‘व्हाॅटस् ॲप’वरील ‘डिलीट फॉर एव्हरी वन’ या फीचरनुसार, तुम्हाला 1 तास, 8 मिनिटे आणि 16 सेकंद तुम्ही पाठवलेला मेसेज डिलिट करण्यासाठी दिले जातात. नंतर तो मेसेज डिलिट करता येत नाही.. मात्र, आता दोन दिवसांनंतरही तुम्हाला चुकून पाठवला गेलेला मेसेज डिलिट करता येणार आहे..

Advertisement

याबाबत ‘व्हाॅटस् ॲप’ बिटा ट्रॅकर WABetaInfo ने माहिती दिली. सध्या ‘व्हाॅटस् ॲप’कडून ॲन्ड्राईड (Android) आवृत्ती 2.22.410 वर ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ फीचरची नवीन वेळ मर्यादा टेस्टिंग केली जात आहे. नवीन अपडेटनंतर प्रत्येकासाठी ‘व्हॉट्स ॲप’चे मेसेज डिलीट करण्यासाठी अडीच दिवसांचा अवधी मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती, की ‘व्हॉट्स ॲप’वरील मेसेज सात दिवसांनंतररही डिलिट करता येतील. ‘व्हॉट्स ॲप’कडून सातत्याने नवीन अपडेटवर काम करण्यात येत आहे. त्यामुळेच लवकरच 7 दिवसांनंतरही ‘व्हॉट्स ॲप’वरील मेसेज डिलीट करता येणार आहेत. अर्थात, त्यासाठी किती कालावधी लागेल, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही.

Advertisement

ग्रुपचाही एक ग्रुप करता येणार
दरम्यान, एका कम्युनिटी फीचरवरही ‘व्हॉट्स ॲप’ सध्या टेस्टींग करीत आहे. त्यानुसार काही ग्रुप्सचा ग्रुप तयार करता येणार आहे. या ‘कम्युनिटी’चा एक ॲडमिन असेल. जो ही कम्युनिटी मॉडरेट करेल. मात्र, एखाद्या मेंबरने एखादा ग्रुप जरी सोडला, तरी तो त्या कम्युनिटीशी जोडलेले इतर ग्रुप पाहू शकणार नाही. युजर्स त्यांच्या या कम्युनिटीला नावही देऊ शकतात. शिवाय, कम्युनिटीचा ॲडमिन स्वतःच्या ग्रुपचे डिस्क्रिप्शनही हवे तसे देऊ शकतील..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी क्लिक करा

Advertisement