SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ दहा ठिकाणी गुंतवणूक कराल, तर महिन्याला पैसे मिळतच राहतील..

देशात म्युच्युअल फंड हे आजच्या काळात गुंतवणुकीचे सर्वात लोकप्रिय माध्यम बनले आहे. कोणताही व्यक्ती आपले कोणतेही आर्थिक उद्दिष्ट आणि निवृत्त लोक पुढील आयुष्यातील काही लक्ष्य पूर्ण करण्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असतात.

खालील 10 ठिकाणी गुंतवणूक तुम्ही करू शकता..

Advertisement

1) फिक्स डिपॉझिट स्कीम: बँकेमधून मासिक उत्पन्न योजनेचा लाभ घेऊन जसे की, फिक्स डिपॉझिट स्कीममधून बँकेत नियमित मासिक उत्पन्नाचा स्त्रोत तयार करता येईल. तुम्हाला प्रत्येक महिन्याला, 3 महिन्याला किंवा वर्षाला व्याज घ्यायचं असेल, त्याप्रमाणे वेळापत्रक बँकेंकडून तुम्ही ठरवून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला व्याज मिळत राहील.

2) पोस्ट ऑफिस मासिक प्राप्ती योजना: पोस्ट ऑफिसच्या योजना या लोकांमध्ये विश्वासू योजना म्हणून ओळखल्या जातात. पोस्ट ऑफिसमध्ये मुदत ठेव ठेवून तुम्ही व्याज मिळवू शकतात. यामध्ये गुंतवणुकीचा कालावधी फक्त 5 वर्षांचा असतो.

Advertisement

3) ज्येष्ठ नागरिक बचत योजना: देशात अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांच्यासाठी ही योजना खूप फायदेशीर आहे. योग्य गुंतवणूक करून व्याज, बँक खात्यात दर तीन महिन्याच्या अंतराने मिळवता येतं.

4) प्रधानमंत्री वय वंदना योजना: जर तुम्ही किंवा घरातील इतर व्यक्ती निवृत्त झाली असेल, तर भारत सरकारने मे 2017 मध्ये सुरू केलेल्या पेन्शन योजनेबद्दल तुम्हाला माहीत असेल. यामध्ये रक्कम गुंतवून तुम्ही 10 वर्षासाठी नियमित उत्पन्न ही मिळवू शकता.

Advertisement

5) कंपनी बाँड: देशातील काही खाजगी कंपन्या या बऱ्याच वेळा बॉण्ड उपलब्ध करतात. तुम्ही डिमॅट खातं काढून बॉण्ड खरेदी करू शकतात. याचं व्याज थेट बँकेत जमा होत असतं.

6) कंपनी मुदत ठेव: सरकारी आणि खाजगी कंपनीतून मासिक/ त्रैमासिक किंवा वार्षिक व्याजासोबतच मुदत ठेव योजना दिली जाते. गुंतवणूक करून तुम्ही उत्पन्न मिळवू शकता.

Advertisement

7) म्युच्युअल फंड: आपल्यापैकी बहुतांश जणांनी यामध्ये म्हणजेच म्युच्युअल फंडमध्ये (Mutual Fund) पैसे गुंतवले असतील. कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी ग्रोथ, पराग पारिख फ्लेक्सी कॅप ग्रोथ, कोटक एमर्जिंग इक्विटी ग्रोथ, आयसीआयसीआय प्रू इक्विटी अँड डेट ग्रोथ असे अनेक फंड आहेत.

8) रिअल इस्टेटमधून नियमित भाडे: तुम्हाला मार्केटचं नॉलेज असेल, तर रिअल इस्टेटमधून भाडयाच्या रूपात उत्पन्न मिळवणे चांगले आणि अधिक फायद्याचे आहे, हे समजून घ्या. पैसा उभारून बिल्डिंग बांधली की, राहण्यासाठी फ्लॅट किंवा व्यावसायिक तत्वावर गाळे भाङ्याने देऊन तुम्ही नियमित पैसे मिळवू शकता.

Advertisement

9) उलट गहाणखत: रिव्हर्स मॉर्गेज म्हणजे जसं आपण एखाद्या प्रॉपर्टीचं गहाणखत करतो. जिथे घरावर किंवा प्रॉपर्टीवर कर्ज मिळू शकतं आणि कर्जाचे हफ्ते जे असतील त्याचा रिव्हर्स ईएमआय म्हणून विचार केला जातो. बँका आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या हे कर्ज देत असतात.

10) सरकारी सिक्युरिटीज / बॉण्ड्स (G-Secs): गव्हर्नमेंट सिक्यूरिटीज (Govt Securities) भारत सरकारच्या वतीने RBI ने उपलब्ध करून दिलेले सरकारी रोखे आहेत. एखाद्या संस्थेसाठी ही गुंतवणूक कमालीची फायदेशीर ठरू शकते. वैयक्तिक गुंतवणूकदारांकडून मात्र खूप कमी प्रमाणात यात गुंतवणूक केिली जाते. डीमॅट खात्याद्वारे याची खरेदी आपण करू शकतो.

Advertisement

( वरील लेखात गुंतवणूक व व्याज या कमी-अधिक जोखमीच्या गोष्टी आहेत, म्हणून तज्ज्ञ व्यक्तीच्या सल्ल्यानेच आपण गुंतवणूक करा.)
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement