SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता गूगल पे वरून पाठवा कितीही पैसे, दररोज कितीपर्यंत ट्रान्सफर करता येणार पैसे? वाचा..

गुगल पे वापरुन दरवर्षी सुमारे 15 अब्ज डिजिटल व्यवहार होत असतात. वर्ष 2021 मध्ये ट्रान्झॅक्शन करण्यासाठी सर्वाधिक भारतीयांनी युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा (UPI) पर्याय निवडला. मग ऑनलाईन शॉपिंग असो की आपल्या जवळील लोकांना पैसे पाठवायचं असो किंवा कुठे ऑफलाईन खरेदी करताना आपण गूगल पे (Google Pay) वापरत असतो.

आपण ATM मधून पैसे काढून देण्यापेक्षा मोबाईलमध्ये UPI Payment Apps वापरून क्षणार्धात पैसे पाठवून व्यवहार पूर्ण करतो. कारण एटीएम सेवा ही वेळेमुळे आणि चार्जेस द्यावे लागत असल्याने खर्चिक असते. पण गुगल पे द्वारे व्यवहार करताना आपण घरबसल्या करू शकतो. त्यासाठी सध्या कोणतेही चार्जेस लागत नाही.

Advertisement

ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी सर्वात जास्त वापरलं जाणारं ॲप म्हणजे गूगल पे. या ॲपवरुन लाखो लोक दैनंदिन व्यवहार करतात. पण मग तुम्ही म्हणाल दररोज व्यवहार आपण करतो परंतु कधी कधी व्यवहार करता येत नाही कारण टेक्निकल प्रॉब्लेम असतो किंवा तुमची दररोज व्यवहार करण्याची मर्यादा संपली असे, असे असेल तर आपण दुसऱ्या दिवशी आपले राहिलेले व्यवहार करतो.

गूगल पे वर दैनंदिन व्यवहार करण्यासाठी काही मर्यादा आहे. ज्यामुळे तुम्ही ठरावीक रक्कम 1 दिवसात ट्रान्सफर करू शकता. पण काही लोकांना दिवसातून अनेकदा व्यवहार करावे लागतात आणि Google Pay वर दिलेली दैनिक मर्यादा त्यांना कमी पडते. त्यामुळे अशा लोकांनी आता काळजी करण्याची गरज नाही त्याना आम्ही दोन मार्ग सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने त्यांना पुन्हा असा प्रॉब्लेम येणार नाही.

Advertisement

तुम्ही पैसे पाठवण्याची मर्यादा कशी वाढवू शकता?

तुम्ही व्यवहार करण्यासाठी एकापेक्षा जास्त पेमेंट ॲप्स वापरू शकता. भारतीय मार्केटमध्ये आजमितीला गूगल पे सारखे इतरही अनेक ॲप्स आहेत, जे आपल्याला ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी अशाच सेवा देतात. त्यापैकी Google pay, फोन पे (phonepe), पेटीएम (PayTm) या नावाजलेल्या ॲप्सचा वापर करून तुम्ही व्यवहार करू शकता.

Advertisement

दुसरा मार्ग असा की, ज्याद्वारे तुम्ही Google Pay ने सेट केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे भरू शकाल. Google Pay द्वारे तुम्ही एका दिवसात जास्तीत जास्त 1 लाखांपर्यंत रक्कम पाठवू शकता. याशिवाय, तुम्ही एका दिवसात जास्तीत जास्त 10 व्यवहार करू शकता. तसेच एका दिवसात 2000 रुपयांपेक्षा जास्त पैशांची रिक्वेस्ट तुम्हाला करता येणार नाही.

परंतु अनेक वेळा ग्राहकांसोबत असे घडते की, बँकेची मर्यादा असूनही ते Google Pay वरून पैसे ट्रान्सफर करू शकत नाहीत, जर तुमच्यासोबतही असे घडले असेल तर तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन तुमची बँक मर्यादा तपासू शकता. जर तुम्ही नेहमी ऑनलाईन व्यवहार करत असाल आणि बिझनेससंबंधीत जास्त मर्यादांचे अनेक व्यवहार तुम्हाला करायचे असतील, तर तुम्ही कस्टमर केअरला कॉल करून तुमची UPI ​द्वारे पैसे पाठवण्याची मर्यादा वाढवण्याची विनंती करू शकता. याशिवाय, तुम्ही Google Pay च्या ग्राहक सेवेशी बोलण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन देखील मदत घेऊ शकता.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement