SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

हिंदुस्थानी भाऊच्या नावाने ऑडिओ क्लिप व्हायरल, वकिलांनी दिलं स्पष्टीकरण..

दहावी-बारावीची परीक्षा (SSC-HSC Exam) ऑनलाईन घेण्याच्या मागणीसाठी सोमवारी (31 जानेवारी) राज्याच्या विविध शहरात दहावी बारावीच्या हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाला सोशल मीडियावर फेमस असलेल्या हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकने विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊसह (Hindustani Bhau) दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

हिंदुस्थानी भाऊच्या वकिलांचं स्पष्टीकरण:

Advertisement

हिंदुस्थानी भाऊने आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आंदोलनास प्रवृत्त केले होते. याच गुन्ह्याखाली त्याला मंगळवारी सकाळी धारावी पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता अटकेत असलेल्या हिंदुस्थानी भाऊचे वकिल ॲड. अशोक मुळे (Advocate Ashok Mule) यांनी भेट घेतल्यानंतर एक व्हिडिओ शेअर करून माहिती दिली आहे.

हिंदुस्थानी भाऊच्या अटकेनंतर सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. “विद्यार्थ्यांसाठी भाऊंना अटक झाली, आता आपण विद्यार्थ्यांनी पुढे येऊन त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे, अशा परिस्थितीत आज दुपारी 12 वाजता धारावी पोलीस ठाण्याबाहेर (Dharavi Police Station) विद्यार्थ्यांनी जमा होण्याचे आवाहन करणारी ऑडिओ क्लिप समोर आली आहे. असा खुलासा हिंदुस्थानी भाऊचे वकील अशोक मुळे यांनी केला.

Advertisement

व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये (Hindustani bhau’s viral audio clip) ‘आज दुपारी 12 वाजता धारावी पोलीस ठाण्याबाहेर विद्यार्थ्यांनी जमा होण्याचं आवाहन’ केलं जात असल्याचं समजलं. पण हिंदुस्तानी भाऊंच्यावतीने त्यांचे वकील अशोक मुळे यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून माहिती दिलीय. त्यात आपण भाऊंसोबत एकत्र आलो आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्याबाहेर जमा होण्याचं आवाहन केलं नसल्याचं स्पष्ट केलं.

हिंदुस्थानी भाऊचं चाहत्यांना आणि विद्यार्थ्यांना आवाहन

Advertisement

हिंदुस्थानी भाऊचे वकील अशोक मुळे यांनी सांगितलं की, मी आताच हिंदुस्थानी भाऊला भेटलो. काही समाजविघातक लोक त्यांच्या नावाने विद्यार्थ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदुस्थानी भाऊकडून चाहत्यांना आणि विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आलं आहे की, “मी जोपर्यंत बाहेर येत नाही, मी स्वत:चा व्हिडिओ शेअर करत नाही तोपर्यंत माझा किंवा माझ्यावतीने दावा करत कोणीही व्हिडिओ शेअर केले तर आंदोलन करू नये. कोणी कुठेही एकत्र येऊ नये. काही लोक माझ्या नावाने परिस्थिती बिघडवण्याचा आणि पोलिसांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. मी स्वत: बाहेर आल्यानंतर बोलेन”, असंही हिंदुस्थानी भाऊच्यावतीने वकिल अशोक मुळे यांनी सांगितले.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement