SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळाले..? शेती विकासासाठी विविध घोषणांचा पाऊस..!

केंद्र सरकारचा 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प (budget-2022) आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सादर केला. मोदी सरकार या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय नागरिक, शेतकरी, नोकरदारांना नेमकं काय मिळते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. केंद्रिय मंत्री सीतारमण यांनी अर्थसंकल्पात विविध घटकांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत.

अर्थसंकल्पात शेतीसाठी काय मिळणार, याबाबत काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. आता अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, त्यातून शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालं, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा
– थेट शेतकऱ्यांच्या खात्यात 2.37 लाख कोटी रुपयांचा ‘एमएसपी'(MSP) हस्तांतरित केला जाणार.
– आगामी काळात रसायनमुक्त, नैसर्गिक शेतीला चालना दिली जाणार. गंगेच्या काठावरील शेतकऱ्यांच्या जमिनीचा 5 किलोमीटरचा कॉरिडॉर पहिल्या टप्प्यात निवडला जाणार.
– तेलबियांची (ऑईल सीड) आयात कमी करण्यासाठी देशांतर्गत उत्पादनास प्रोत्साहन दिले जाणार.

– ‘पीपीपी मॉडेल’ अंतर्गत योजना राबवल्या जाणार असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना डिजिटल व हायटेक तंत्रज्ञानाशी जोडले जाईल.
– शेतीच्या मूल्यांकनासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जाणार. सोबतच ड्रोनच्या माध्यमातून पोषक आणि कीटकनाशकांच्या फवारणीलाही चालना दिली जाणार.
– कृषी विद्यापीठांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन दिले जाईल.

Advertisement

– सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
– शेतीशी संबंधित स्टार्ट अप्स आणि ग्रामीण उद्योगांना ‘नाबार्ड’च्या माध्यमातून वित्तपुरवठा केला जाईल.
– फळे आणि भाजीपाल्याची योग्य व्हरायटी वापरण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना सर्वसमावेशक पॅकेज देणार असून, त्यात राज्यांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे.

– 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ म्हणून घोषीत.
– 2021-22 च्या रब्बी हंगामात 163 लाख शेतकऱ्यांकडून 1208 मेट्रिक टन गहू आणि धान खरेदी करण्यात येणार
– शेतकऱ्यांना डिजिटल सेवा देण्यात येणार, भारतातील गरिबी हटवण्याचे ध्येय

Advertisement

– झिरो बजेट शेती आणि नैसर्गिक शेती, आधुनिक शेती, मूल्यवर्धन आणि व्यवस्थापनावर भर दिला जाणार
– सिंचन-पिण्याचे पाणी वाढवण्यावर भर देणार, जलसंपदा विकास मंत्रालयाच्या मदतीने देशातील 5 मोठ्या नद्या जोडण्याचे काम करणार.
– देशातील 9 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार असून, त्यासाठी नवीन योजना राबविणार..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Advertisement