SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अर्थसंकल्प: पोस्ट ऑफिसमध्ये एटीएम सेवा सुरू होणार ते शालेय शिक्षणासाठी 100 टीव्ही चॅनल्स, अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्दे वाचा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये देशातील जनतेसाठी अनेक महत्त्वाच्या सुविधा, योजनांची घोषणा करण्यात आल्या आहेत. जाणून घेऊ सविस्तर..

अर्थसंकल्पीय भाषणातील प्रमुख मुद्दे आणि घोषणा

Advertisement

▪️ पुढील आर्थिक वर्षात 9.2% विकास दर अपेक्षित
▪️ शालेय शिक्षण: विद्यार्थ्यांसाठी PM E-Vidya योजने अंतर्गत 100 टिव्ही चॅनल्सची घोषणा, स्थानिक भाषेतून शिक्षण देणार
▪️ 2022 मध्ये 5G सेवा सुरू केली जाणार, गावांमध्ये ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित केल्या जाणार
▪️ सरकारी टेंडरचे नियम बदलणार, संपूर्ण प्रक्रिया डिजिटल होणार

 

Advertisement

▪️ कॉर्पोरेट टॅक्स (Corporate Tax) 18% वरून 15% वर, सहकार क्षेत्राला मोठा दिलासा
▪️ आरबीआय 2022 मध्ये डिजिटल चलन लाँच करणार, देशात अधिकृतपणे डिजिटल चलन सुरू केले जाणार
▪️सलग सहाव्या वर्षी आयकारात कोणताही बदल नाही, आयटीआर (ITR) मधील विसंगती सुधारण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी दिला जाणार
▪️यंदाच्या वर्षांपासून देशात ई-पासपोर्ट सेवा सुरू होणार, त्यात चिपचा असणार समावेश

 

Advertisement

▪️ ऊर्जा, वाहतूक, विपणन यावर भर दिला जाणार
▪️ सरकारकडून संरक्षण क्षेत्रात संशोधनासाठी 25 टक्के बजेटची तरतूद केली जाणार
▪️आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मध्ये नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार
▪️ विविध शहरांची गरज ओळखून मेट्रोचे जाळ उभारणार
▪️ पुढील आर्थिक वर्षात 25 हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बनवले जाणार
▪️ क्रिप्टोकरन्सीवरील कमाईवर 30% कर लागणार

 

Advertisement

▪️मोबाईल फोन आणि चार्जर स्वस्त होणार
▪️ पोस्ट ऑफिसमध्ये एटीएम सेवा सुरू होणार
▪️अर्थसंकल्पात सौरऊर्जा निर्मितीसाठी 19,500 कोटी रुपयांची तरतूद, देशात सौरऊर्जेसाठी सौर पॅनेल आधारित ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यावर भर
▪️ इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन चार्जिंग स्टेशन्स बसवण्यात येणार, बॅटरी अदलाबदली म्हणजेच बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी (battery swapping policy) लागू करणार
▪️ ‘पंतप्रधान गती योजने’तंर्गत पायाभूत सुविधांसाठी 20 हजार कोटींचा निधी

 

Advertisement

▪️ आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देत 60 लाख नवे रोजगार निर्माण करणार
▪️ 3 वर्षात 400 नवीन वंदे भारत ट्रेन्स उभारणार
▪️ एलआयसीचा आयपीओ लवकरच बाजारात आणणार
▪️ नाबार्डच्या माध्यमातून स्टार्टअपना मदत करणार
▪️ जलसिंचन योजनेच्या माध्यमातून 9 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार
▪️ पंतप्रधान आवास योजनेसाठी 48 हजार कोटींची नव्याने तरतूद, 2023 पर्यंत 80 लाख नवीन घरे बांधणार

 

Advertisement

▪️ टपाल आणि रेल्वे नेटवर्कच्या एकत्रीकरणात पुढाकार घेतला जाणार; एक स्टेशन, एक उत्पादन ही संकल्पना राबवली जाणार
▪️पिण्याचे पाणी वाढवण्यावर भर देणार, देशभरातील 5 मोठ्या नद्या जोडण्याचे काम सुरु करणार
▪️ हा अर्थसंकल्प 2047 पर्यंतचा ब्लूप्रिंट

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय?

Advertisement

▪️ देशात तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार, पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर होणार
▪️ 9 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार, त्यासाठी नवीन योजना राबविणार
▪️ 1 कोटी 63 लाख शेतकऱ्यांकडून विक्रमी धान्य खरेदी केली जाणार, 2.37 लाख करोड रुपये MSP Value शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार
▪️ देशात प्रचंड प्रमाणावर तेलबिया आयात केल्या जाणार, तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार
▪️ शेतकऱ्यांना पिकावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करणार

 

Advertisement

▪️ नैसर्गीक शेतीसाठी झिरो बजेट शेतीला प्रोत्साहन देऊन नियोजन करण्यासाठी योजना राबविणार
▪️ ग्रामीण विकासासाठी प्रयत्न करणार, कृषी आधारीत स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देणार, युवकांना मदत करण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून भांडवल पुरवणार
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement